Type Here to Get Search Results !

“बांधकाम विभागाचे करायचं काय, खाली मुंडे वर पाय” I “बांधकाम विभाग सुस्त, रस्त्यावर तलाव भरलाय मस्त” I “या” ठिकाणी बांधकाम विभागाच्या विरोधात आंदोलन

 


म्हसवड/अहमद मुल्ला : “बांधकाम विभागाचे करायचं काय, खाली मुंडे वर पाय”, “बांधकाम विभाग सुस्त, रस्त्यावर तलाव भरलाय मस्त” , “बांधकाम विभागाचे काम म्हणजे प्रवासी मरेपर्यंत थांब” अशा घोषणा देत तत्कालीन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हसवड मायणी रस्त्यावरील वडजल येथे पाण्याने भरलेला खड्डा येत्या आठ दिवसात बुजवून सदर रस्ता प्रवाशी वर्गांसाठी तात्काळ दुरुस्त करावा अन्यथा, बांधकाम विभागाच्या विरोधात म्हसवड मायणी रस्त्यावर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा तत्कालीन शिवसेनेच्या माण तालुका महिला प्रमुख प्रा. पुनम माने यांनी दिला.


म्हसवड-मायणी रस्त्यावर वडजल येथे स्टँड परिसरात भरस्त्यात मोठा खड्डा पडला असून या खड्ड्यात पाणी साचल्याने प्रवाशांना जीव धोक्यात घालून या खड्ड्यातून प्रवास करावा लागतो. या खड्ड्यामुळे अनेकांचे अपघातही झालेले आहेत. अशा बिकट अवस्थेत असलेला हा खड्डा बांधकाम विभागाने त्वरित बुजवावा अशी मागणी तत्कालीन शिवसेनेच्या वतीने करण्यात आली होती. ही मागणी तात्काळ पूर्ण केली नाही तर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता.


सदर रस्ता बुजवण्याचे काम झाले नाही म्हणून, वडजल येथे म्हसवड मायणी रस्त्यावर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी बांधकाम विभागा विरोधात घोषणाबाजी करून सदर खड्ड्यात महिलांनी खणा नारळाची ओटी भरुन सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध केला. यावेळी प्रा. पूनम माने, तालुका संघटक माणिक घाडगे महाराज, म्हसवड शहर प्रमुख राहुल मंगरुळे, कुकडवाड विभाग प्रमुख अमोल शिंदे, गोंदवले विभाग प्रमुख अमित कुलकर्णी, उपशहर प्रमुख सचिन भोकरे, आनंद बाबर, उपविभाग प्रमुख प्रवीण कट्टे, पानवन शाखाप्रमुख रोहिदास नरळे, महाबळेश्वरवाडी शाखाप्रमुख विजय काटकर, उपशाखाप्रमुख सुनील मगर, जांभळीचे युवा नेते नाथा काळेल, महादेव नलवडे, संतोष सकट, सुखदेव माने, गुलाब चव्हाण, संतोष चव्हाण, संभाजी माने, महेंद्र बहारे, गणेश कोळी, अक्षय गुरव, बापूराव सकट, प्रसाद माने तसेच वर्धन सोसायटीचे संचालक शोभा काटकर मंगल काटकर नदीने काटकर मुक्ताई काटकर सुनंदा काटकर चैतन्य केंगार व मनीषा काटकर व इतर सैनिक उपस्थित होते.


यावेळी बोलताना महिला आघाडीच्या प्रमुख प्रा. पूनम माने म्हणाल्या, माण तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका असून या तालुक्यात रस्त्यांची खूप मोठी दुरावस्था झाली असल्याने प्रवाशांना अनेक रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत धरून करावा लागतो. मानवाचे शरीर जसं सुसूत्र चालण्यासाठी आपल्या शरीरात अनेक रक्तवाहिन्या आहेत त्याच पद्धतीने मानवाचे दळणवळण होण्यासाठी चांगले रस्ते आवश्यक असतात. 


परंतु आपल्या तालुक्यातील ग्रामीण भागातील “एक तर रस्ता चांगला दाखवा आणि एक हजार रुपये बक्षीस मिळवा” अशी अवस्था रस्त्यांची झाली आहे. या तालुक्यातून खासदारकीला भरगच्च मताने निवडून गेलेले खासदार रणजितसिंह निंबाळकर हे निवडणूक झाल्यापासून तालुक्याकडे फिरकले नाहीत किंवा सर्वसामान्य माणसाला दिसलेही नाहीत. गेली तीन वर्ष खासदारांनी माण तालुक्याकडे पाठ फिरवली आहे. म्हणून आज वडजलगावचे आराध्य दैवत माता वडजाईदेवीला साकडं घालते की देवी खासदार साहेबांचे तेवढे विकास काम करताना दर्शन होऊ दे.आम्ही सर्व शिवसैनिक माता वडजाई देवीची खणा नारळाने ओटी भरू अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.


 सार्वजनिक बांधकाम विभाग दहिवडी यांनी सदर रस्ता बुजवण्याचे तात्काळ सुरू करणार असल्याचे लेखी दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र जर का हे काम सुरू झाले नाही तर येत्या आठ दिवसात चक्काजाम आंदोलन करू असा इशाराही यावेळी प्रा. पुनम माने यांनी दिला. म्हसवड पोलीस ठाण्याचे पोलीस हवलदार अभिजीत भादुले, सुरज काकडे व इतर कर्मचाऱ्यांनी यावेळी चोख  बंदोबस्त ठेवला होता.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies