Type Here to Get Search Results !

श्री बलभीम विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी कामथ गावाच्या सुपुत्राची नियुक्ती



माणदेश एक्सप्रेस न्युज : कोल्हापूर : कोल्हापूर येथील श्री सिद्धिविनायक एज्युकेशन सोसायटीच्या श्री बलभीम विद्यालयाच्या रिक्त झालेल्या मुख्याध्यापक पदावर मुळचे आटपाडी तालुक्यातील कामथ गावाचे सुपुत्र अनिल सरक यांची नियुक्ती संस्थेने केली आहे.  


ही अनुदानित प्राथमिक शाळा कसबा बावडा कोल्हापूर येथे चालवली जाते. संस्थेचे संस्थापक व इतर सर्व पदाधिकारी हे उच्चशिक्षा विभुषित आहेत. शाळेच्या रिक्त झालेल्या मुख्याध्यापक पदावर संस्थेच्या वतीने शाळेतील सहा. शिक्षक अनिल लक्ष्मण सरक यांची नियुक्ती करण्यात आली. संस्थेचे संस्थापक, पदाधिकारी सर्व संचालक, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी एकमताने अनिल सरक यांच्या नियुक्तीला आनंदाने संमती दिली.


अनिल सरक यांचे प्रामाणिक काम, सर्वाना सोबत घेऊन काम करण्याची पद्धत, संस्था व शाळा याचा योग्य समन्वय ठेवण्याची कल्पकता यामुळे त्यांच्या निवडीला सर्वांकडून एकमताने संमती मिळाली. संस्था अध्यक्ष विनायक कारंडे, उपाध्यक्ष श्रीकांत चव्हाण व सचिव इंद्रजित कारंडे यांनी अनिल सरक यांना मुख्याध्यापक म्हणून फक्त नियुक्ती आदेश न देता संस्थेने सरक सरांसाठी नवीन टेबल व नवीन खुर्ची देऊन खऱ्या अर्थाने अनिल सरक यांच्यावरील प्रेम दाखवलेच शिवाय एका प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक पदाचा सन्मानही वाढवला आहे. 


अनिल सरक हे आटपाडी तालुक्यातील  कामथ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा आटपाडी बाजार समितीचे विद्यमान संचालक सुनील सरक यांचे लहान बंधू आहेत. त्यांच्या या निवडीमुळे त्यांचे अभिनंदन होत आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies