Type Here to Get Search Results !

उप मुख्यमंत्री अजित पवार आज सांगली जिल्हा दौऱ्यावर : दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पहा



माणदेश एक्सप्रेस न्यूज : सांगली : राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार हे आज सोमवार, दि. 5 फेब्रुवारी 2024 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.


आज सोमवार, दि. 5 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता कोल्हापूर विमानतळ येथून मोटारीने प्रयाण व दुपारी 3.45 वाजता बालाजी आयकॉन बिल्डींग तहसिल कार्यालय इस्लामपूर येथे आगमन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इस्लामपूर कार्यालय उद्घाटन (फीत कापणे). 


दुपारी 4.15 वाजता मोटारीने प्रयाण, सायंकाळी 5 वाजता विटा (गार्डी) ता. खानापूर येथे आगमन व स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या दु:खद निधनानिमित्त त्यांच्या कुटूंबियांची सांत्वनपर भेट. नंतर मोटारीने प्रयाण, सायंकाळी 5.20 वाजता श्री. सदाशिवराव पाटील, माजी आमदार यांचे निवासस्थान, पुण्याई, यशवंतनगर विटा येथे आगमन व राखीव. 


सायंकाळी 6 वाजता मोटारीने प्रयाण, सायंकाळी 6.40 वाजता स्वामी समर्थ घाट गणपती मंदिरा मागे सांगली येथे आगमन व सांगली येथील जिल्हास्तरीय पुरूष कबड्डी निवड चाचणी स्पर्धेस भेट, नंतर मोटारीने प्रयाण, सायंकाळी 7.15 वाजता शिवप्रेमी क्रीडांगण अकुज ड्रीमलॅण्ड कुपवाड येथे आगमन व कै. भाई नेरूरकर राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा उद्घाटन सोहळा. 


रात्री नंतर मोटारीने प्रयाण, रात्री 8.30 वाजता श्री. पद्माकर जगदाळे यांचे निवासस्थान धनवंत बंगला, स्टेट बँक कॉलनी, सह्याद्रीनगर, सांगली येथे आगमन व राखीव. रात्री 9.10 वाजता मोटारीने कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies