Type Here to Get Search Results !

सांगली : दिवाळी सणानिमित्त चार लाखाहून अधिक शिधापत्रिकाधारकांना मिळणार फक्त “एवढ्या” रुपयात चार शिधावस्तुंचा संच



सांगली : सांगली जिल्ह्यामध्ये शासन निर्णयानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांना आगामी दिवाळी सणानिमित्त 100 रुपयात चार शिधावस्तु वाटपाचा निर्णय घेतला आहे. 


शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याव्यतिरिक्त प्रत्येकी एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर व एक लिटर पामतेलाचा संच दिला जाणार आहे. सांगली जिल्ह्यातील 4 लाख 12 हजार 676 लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार असून पुरवठा विभागाकडून वाटपाचे नियोजन हाती घेण्यात आले आहे. अशी माहिती  जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल यांनी दिली.


पात्र रेशनकार्डधारकांना शिधाजिन्न्स संच प्रतिशिधापत्रिका ई-पॉस प्रणालीव्दारे शंभर रूपये दराने वितरीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यासाठी आवश्यक शिधाजिन्न्स संचाची मागणी महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटीव्ह कन्झुमर्स फेडरेशन लिमिटेड (मुंबई) यांच्याकडे सादर केली आहे. त्यानुसार शिधाजिन्न्स संच कंत्राटदार संबंधित तालुका गोदामापर्यंत पोहोचवेल.


संचात समाविष्ट शिधाजिन्न्स एफएसएसएआय मानकाची पूर्तता करत असल्याचे एनएबीएल अधिस्वीकृत प्रयोगशाळेचे प्रमाणपत्र कंत्राटदाराकडून प्राप्त करून घेवून त्यानंतर शिधाजिन्न्स संच स्वीकारण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत निकृष्ट दर्जाचे शिधाजिन्न्स संच स्वीकारले जाणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आदेश शासनाने पुरवठा अधिकाऱ्यांना दिले असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल यांनी सांगितले.



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies