Type Here to Get Search Results !

दिग्दर्शक ओम राऊत यांच्या चित्रपटाला भाजपचा विरोध तर मनसेचा पाठिंबा



मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून वादाला तोंड फुटलं आहे. चित्रपटातील व्हीएफक्स आणि सैफ अली खानने साकारलेल्या ‘रावणा’च्या भूमिकेवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. त्यातच भाजपचे प्रवक्ते आमदार राम कदम यांनी महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशाराच दिला असला तरी मनसेने मात्र ओम राऊत यांना पाठिंबा दिला असून जाहीरपणे आपली भूमिका मांडली आहे.


याबाबत भाजपचे प्रवक्ते आमदार राम कदम यांनी ट्वीट केले असून यामध्ये ते म्हणतात, “आदिपुरुष” हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. या चित्रपटात निर्मात्यांनी पुन्हा एका किरकोळ प्रसिद्धीसाठी आमच्या देवी देवतांचं विडंबन करुन कोट्यवधी हिंदू लोकांच्या श्रद्धा आणि आस्थेला ठेच पोहोचवली आहे. आता वेळ आली आहे… या विडंबनाचा फक्त माफीनामा.” असे राम कदम यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. “दृश्यांची काटछाट करून चालणार नाही. अशी घाणेरडी विचारधारणा असलेल्या लोकांना धडा शिकवायलाच हवा. अशाप्रकारच्या कोणत्याही चित्रपटावर कायमची बंदी किंवा संबंधित लोकांनी इंडस्ट्रीत काम करण्यावर काही वर्ष बंदी घालण्यात यावी. जेणेकरून भविष्यात कोणीही पुन्हा असं करण्याची हिंमत करणार नाही. हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला आहे.


तर मनसे अमेय खोपकर यांनी ट्वीट केले असून ते म्हणतात, “ओम राऊत या दिग्दर्शकाने यापूर्वी लोकमान्य आणि तान्हाजी या कलाकृतींमधून इतिहासाची अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात ओम राऊत यांनी साकारलेला भव्य लाईट अँड साऊंड शो आजही दिमाखात सुरु आहे. त्यांच्या आगामी ‘आदिपुरुष’ टीझरवरुन टीका होणं दुर्दैवी आहे,” असं अमेय खोपकर म्हणाले आहेत. ओम राऊत आणि सहकाऱ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांची प्रचिती चित्रपट प्रदर्शित झाल्यावर येईल अशी आम्हाला खात्री आहे. म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचा ‘आदिपुरुष’ चित्रपटाला पूर्ण पाठिंबा आहे, असं अमेय खोपकर यांनी स्पष्ट केलं आहे.


त्यामुळे मनसेची जवळीक करणाऱ्या भाजपला पुन्हा एकदा मनसेने इशारा दिला असून त्यामुळे “आदिपुरुष” या चित्रपटावरून पुन्हा एकदा भाजप-मनसे युतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies