Type Here to Get Search Results !

आज ‘धनुष्यबाण’ कोणाचा? निकाल : उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे गटाला मिळणार धनुष्यबाण चिन्ह



मुंबई : आज ‘धनुष्यबाण’ कोणाचा? निकाल लागणार असून, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे गटाला मिळणार धनुष्यबाण चिन्ह का? पुन्हा तारीख पडणार याकडे संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे.


राज्यातील अंधेरी-पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीची घोषणा झाली असून ३ नोव्हेंबर रोजी ही निवडणूक पार पडणार आहे. १४ ऑक्टोबर म्हणजेच आठवडाभरामध्ये या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यापूर्वी शिवसेना नेमकी कोणीची या वादातील महत्त्वाचा मुद्दा असणाऱ्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हा संदर्भातील दाव्याबद्दलचे पुरावे सादर करण्यासाठी दोन्ही गटांना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेली मुदत आज संपुष्टात येत आहे. त्यामुळे आज हा निकाल लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 


निवडणूक आयोगाने  दोन्ही गटांना पुरावे सादर करण्यासाठी दिलेली मुदत आज संपत आहे. त्यातच शिंदे गटाने अर्ज करुन उद्धव ठाकरे गटाकडे पुरेसे पाठबळ नसताना त्यांच्याकडून धनुष्यबाण या चिन्हाचा अंधेरी पोटनिवडणुकीत चुकीच्या पद्धतीने वापर केला जाईल असा दावा केला आहे. याच कारणामुळे तातडीने सुनावणी घ्यावी अशी मागणी शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies