Type Here to Get Search Results !

शेतात असताना धुऱ्यावरून वाद झाल्याने एकाचा मृत्यू



खामगाव :  धुऱ्याच्या वादातून एकाने शेजाऱ्याची हत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी खामगाव तालुक्यातील तरोडा नाथ येथे घडली. रघुवीर हरदास घोती (६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आरोपीला पिंपळगाव राजा पोलीसांनी अटक केली आहे.


 खामगाव तालुक्यातील तरोडानाथ येथील रघुवीर हरदास घोती (६५) आणि देवराम काशिराम वाघमोडे (६०) यांचे शेत शेजारी शेजारी आहे. मंगळवारी सकाळी दोघांमध्ये शेतात असताना धुऱ्यावरून वाद झाला. 


वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. त्यानंतर  देवराम काशिराम वाघमोडे याने रघुवीर घोती यांच्या छातीत विट फेकून मारली. वाघमोडे याने केलेला प्रहार एवढा घातक होता की रघुवीर घोती हा वृध्द इसम जागीच कोसळून ठार झाला. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies