Type Here to Get Search Results !

आटपाडी : मिटकीतील दोन टन लोखंडी सळई चोरणारे चोरटे पडकले



आटपाडी : आटपाडी तालुक्यातील मिटकी येथील दोन टन लोखंडी सळई चोरणारे चोरटे पडकले असून त्यांच्याकडून चोरीला गेलेला माल जप्त करण्यात आला असून सदरील माल फिर्यादीच्या ताब्यात देण्यात आला आहे.


मिटकी येथील जगन्नाथ बाबा कोळपे (वय ५१) यांचे मिटकी येथे  नवीन घराचे बांधकाम करणेसाठी दोन टन लोखंडी सळई  आणल्या होत्या. परंतु सदरच्या सळई ह्या अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्या होत्या. म्हणुन त्यांनी आटपाडी पोलीस ठाणे येथे दि. २/७/२०२२ रोजी गुन्हा दाखल केला होता. 


याबाबत सदर गुन्ह्यातील आरोपी यांना सांगोला पोलीस ठाणेकडील पथकाने पकडुन त्यांचेकडुन वरील २ टन लोखंडी सळई जप्त करण्यात आल्या होत्या. सदरचा मुद्देमाल गुन्ह्याचे तपासीक अंमलदार सपोफौ भांगरे, पोना वगरे यांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करुन सांगोला पोलीस ठाणे येथुन आटपाडी पोलीस ठाणेस आणुन फिर्यादी जगन्नाथ बाबा कोळपे यांना मुद्देमाल परत केलेला आहे.


सदरची मुद्देमाल निर्गती व गुन्हे तपास कारवाई ही उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पद्मा कदम याचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.मेमाणे, सपोफौ भांगरे, पोना ठोंबरे, मुद्देमाल कारकुन पोना माने, पोना वगरे यांनी केलेली आहे.



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies