Type Here to Get Search Results !

दुर्गादेवी ज्योत आणताना वाहनातून पडल्याने युवकाचा मृत्यू

  



जत :  तुळजापूरहून दुर्गामाता ज्योत घेऊन येत असताना वाहनातून तोल जाऊन रस्त्यावर पडल्याने उमदी (ता. जत) येथील करणाप्पा दऱ्याप्पा ऐवळे (वय २२) हा तरुण जागीच ठार झाला. कर्नाटकातील हलसंगी फाट्यावर ही सोमवारी सकाळी ही घटना घडली.


उमदी (ता. जत) येथील काही तरुण नवरात्रीउस्तव  दुर्गामाता ज्योत आणण्यासाठी तुळजापूर (जि. उस्मानाबाद) येथे गेले होते. गावात मोलमजुरी करणारा करणाप्पा ऐवळे हाही त्यांच्यासोबत गेला होता. ज्योत घेऊन तुळजापूर सोलापूर पुढे कर्नाटकातील झळकी चडचण उमदी या मार्गे सर्वजण उमदीस परतत होते.


परत येत असताना कर्नाटकातील झळकी ते चडचणदरम्यान असलेल्या हलसंगी फाट्यावर अचानक तोल गेल्याने करणाप्पा वाहनावरुन थेट रस्त्यावर पडला. वर्मी मार लागल्याने जागीच त्याचा मृत्यु झाला. देवीच्या उत्सवासाठी ज्योत आणण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या अपघाती मृत्यूची माहिती मिळताच गावावर शोककळा पसरली. घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies