Type Here to Get Search Results !

लग्नासाठी नकार दिल्याने युवकानं उचललं भयानक पाऊल

 


उत्तरप्रदेश : मथुरा येथे एकतर्फी प्रेमातून सनकी प्रियकरानं मुलीसमोर स्वत:वर धारदार शस्त्रानं वार केले त्यानंतर मुलीवरही हल्ला करत तिला गंभीर जखमी केले. या घटनेतील युवक-युवतीला जिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. तिथे युवकाची परिस्थिती नाजूक आहे. तर जखमी युवतीवर उपचार करून तिला हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, युवक हा वाहनचालक आहे. तो शेजारील राहणाऱ्या मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता. या मुलीसमोर अनेकदा त्याने प्रेमाची कबुली दिली. परंतु मुलीने त्याकडे दुर्लक्ष केले. सोमवारी सकाळी युवकाने त्या मुलीला पाहिल्यानंतर सर्वांसमोर तिला लग्नाची मागणी घातली. मात्र मुलीने नकार दिला. त्यामुळे युवकाचा संताप अनावर झाला. त्याने मुलीसमोर धारदार शस्त्राने स्वत:वर वार केले. तो इथेच थांबला नाही तर त्याने मुलीवरही जीवघेणा हल्ला केला. या घटनेत दोघेही जखमी झाले. 

मुलीचा आक्रोश ऐकून लोक जमले. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना देत जखमींना पोलिसांच्या मदतीने हॉस्पिटलला दाखल केले. याठिकाणी युवकाची प्रकृती नाजूक आहे असं डॉक्टरांनी म्हटलं तर युवतीला प्राथमिक उपचार देत घरी सोडण्यात आले आहे. याबाबत युवकाची आई म्हणाली की, माझा मुलगा सकाळी उठल्यानंतर सीएनजी गॅस भरण्यासाठी जात होता. त्यावेळी शेजारच्यांनी त्याला घेरले आणि त्याच्यावर हल्ला केला. हा हल्ला का केला याबाबत मला काही माहिती नाही असं त्यांनी सांगितले. 


पोलिसांना स्थानिकांनी फोन करून युवक-युवती जखमी असल्याचे सांगितले. सध्या युवकाने स्वत:वर हल्ला केला की त्याच्यावर कुणी हल्ला केला याबाबत पोलीस तपास करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies