Type Here to Get Search Results !

म्हसवड : जबरी चोरीचा गुन्हा उघड : ४३५ ग्रॅम सोन्यासह १७ लाख ८३ हजार ७८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त



म्हसवड : म्हसवड-माळशिरस रोडवरती म्हसवड येथील सोनारास दिनांक २७ जुलै २०२२ रोजी लुबाडून त्याच्याकडील १५ लाख ६२ हजार रुपयांची सोने असलेले बॅग अज्ञात चोरट्यांनी जबरी चोरी केली. सदर गुन्हाच तपास उकल झाला असून पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे.


याबाबत  अजय कुमार बंसल, पोलीस अधीक्षक सातारा व अजित बोऱ्हाडे, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने उघड करणेकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सदर गुन्हयाचे तपासकामी सपोनि रमेश गर्ने व पोउनि अमित पाटील यांच्या अधिपत्त्याखाली तपास पथक तयार केले होते.


सदर तपास पथकाने सातारा तसेच सोलापुर जिल्हयात जावुन गोपनीय माहिती प्राप्त केली. तसेच फिर्यादीच्या येणाऱ्या व जाणाऱ्या मार्गावरील सी.सी.टी.व्ही.फुटेजेस तपासले. दरम्यान सदरचा गुन्हा म्हसवडमधील एका सोनाराने त्याच्या साथीदारांमार्फत केला असल्याची गोपनीय माहिती तपास पथकास प्राप्त झाली. त्या माहितीच्या आधारे अधिक माहिती काढली असता म्हसवडमधील संबंधीत सोनाराने त्याच्या माळशिरस जि.सोलापुर तसेच धुळदेव, मासाळवाडी ता.माण येथील साथीदारांसह सदरचा गुन्हा केल्याची खात्री झाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 1) दुर्वा उर्फ दुर्योधन नाना कोळेकर वय ३४ वर्षे रा.धुळदेव ता.माण जि.सातारा २)योगेश तुकाराम बरडे वय ३५ वर्षे रा. पिलीव रोड बरडे वस्ती माळशिरस ता. माळशिरस जि.सोलापूर ३)रामदास विठ्ठल गोरे वय २० वर्षे रा. मासाळवाडी ता.माण जि.सातारा ४)रणजित भाऊ कोळेकर वय २० वर्षे रा. धुळदेव ता.माण जि.सातारा या संशयिताना दिनांक २१ सप्टेंबर २०२२ रोजी माळशिरस जिल्हा सोलापूर, म्हसवड जि.सातारा तसेच नालासोपारा जि.पालघर येथून ताब्यात घेवून त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे सांगितले. त्यांना गुन्हयाचे तपासकामी म्हसवड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देवुन त्यांना गुन्हयात अटक करुन मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोट महसवड यांचेसमक्ष हजर केले असता न्यायालयाने त्यांची दिनांक २८ सप्टेंबर २०२२ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.


आरोपींच्या पोलीस कोठडी रिमांडचे मुदतील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तसेच म्हसवड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या पथकाने आरोपीकडे सखोल तपास करुन गुन्हयात चोरी गेलेल्या ४६९ ग्रॅम सोन्यापैकी १४ लाख ५८ हजार २३० रुपये किमतीचे ४३५ ग्रॅम लगड स्वरुपातील सोने जप्त केले. आहे. याशिवाय आरोपांनी गुन्हयात वापरलेली एक पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी k 10 कार, एक काळया रंगाची स्प्लेंडर प्लस मोटार सायकल, गुन्हयात वापरलेले नकली पिस्टल व चाकु असा एकूण १७ लाख ८३ हजार ७८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक, सातारा तसेच अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी अभिनंदन केले.



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies