Type Here to Get Search Results !

आम. गोपीचंद पडळकर यांचे वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांना आवाहन, म्हणाले.....



आटपाडी : भाजपचे प्रवक्ते विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांचा 1 ऑक्टोबर हा जन्मदिवस आहे. यानिमित्त त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांची रीघ ही झरे येथील आम. पडळकर यांच्या निवासस्थानी लागलेली असते. 


परंतु आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावेळी मात्र वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांना आवाहन केले असून वाढदिवसानिमित्त हार, फुले, बुके यावर खर्च न करता पुस्तके, वह्या, पेन व शालापयोगी साहित्य आणण्याचे आवाहन केले आहे. सदरच्या जमा होणाऱ्या वही, पेन, पुस्तके ही गरजू मुलांना वाटप करण्यात येणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी प्रामुख्याने वही, वही आणावेत असे भाजपचे तालुकाध्यक्ष उमाजी सरगर यांनी आवाहन केले आहे.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies