Type Here to Get Search Results !

खरसुंडी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही



मनोज कांबळे /खरसुंडी : सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी खरसुंडी (ता.आटपाडी) येथील तीर्थक्षेत्रात भेट दिली. तीर्थक्षेत्र 'ब' वर्गात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्री खाडे यांचा नियोजित दौरा नसतानाही कुलदैवत सिद्धनाथांच्या दर्शनासाठी खरसुंडी येथे आले होते. श्री सिद्धनाथाच्या कृपेने आमदार, मंत्री व पालकमंत्री झालो असल्याने विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही पालकमंत्री खाडे यांनी दिली. 


भाजप ओबीसी सेलच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त खरसुंडी येथील दर्शन मंडपात जीवन कार्यातील छायाचित्र प्रदर्शनास ना.खाडे यांनी भेट दिली. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, विलास काळेबाग, धोंडीराम इंगवले उपस्थित होते.


 पालकमंत्री खाडे म्हणाले, श्री सिद्धनाथ हे आमचे कुलस्वामी आहेत. मी पेड गावातून नाथांच्या दर्शनासाठी पूर्वी पायी चालत आलो आहे. सिद्धनाथांच्या कृपेने मला सर्व काही मिळाले. सध्या देवस्थान 'क' वर्गामध्ये असल्याने विकासासाठी निधी कमी पडत आहे. हे तीर्थक्षेत्र 'ब' वर्गात आणण्यासाठी माझा प्रयत्न राहील. तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. ज्यावेळी आटपाडी दौरा होईल त्यावेळी विशेष लक्ष घातले जाईल. प्रधानमंत्री मोदीजी यांच्या जीवनकार्यातील छायाचित्र प्रदर्शनामुळे सर्वसामान्यांपर्यंत विकासाचे काम दिसत आहे. केंद्रातील योजनांचा लाभ नागरिक व शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर मिळत आहे.


यावेळी सरपंच लता अर्जुन पुजारी यांनी खरसुंडी गावच्या विकासासाठी रिंग रोड व तीर्थक्षेत्र 'ब' वर्गात घालण्यासाठी लेखी निवेदन दिले. ग्रामपंचायत व देवस्थानच्या वतीने पालकमंत्री सुरेश खाडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, मार्केट कमिटीचे माजी सभापती भाऊसाहेब गायकवाड, खरसुंडी सोसायटीचे चेअरमन धोंडीराम इंगवले, राहुल गुरव, विलास शिंदे, देवस्थानचे चेअरमन चंद्रकांत पुजारी, उपसरपंच सुवर्णा पुजारी, दिलीप सवने, प्रणव गुरव, महादेव पाटील, शंकर भिसे, विवेक पुजारी, दीपक जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies