Type Here to Get Search Results !

दीपक हुड्डा आफ्रिका मालिकेतून बाहेर : 'या' तीन खेळाडूंना मिळाली संधी



नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर असून यांच्यात तीन टी-२० सामन्यांची मालिकेला आजपासून  सुरु होत आहे. त्यानंतर या दोन्ही संघामध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकाही रंगणार आहे. मात्र, सामना सुरु होण्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. दिग्गज खेळाडू दीपक हुड्डा) दुखापतीमुळं मालिकेतून बाहेर पडला आहे. 


तर दक्षिण आफ्रीका विरुद्ध होणाऱ्या टी-२० सीरिजच्या आधी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. तीन दिग्गज खेळाडूंचा या संघात समावेश नसणार आहे. हार्दिक पंड्याला बीसीसीआयने विश्रांती दिली आहे. त्यामुळे या तीन खेळाडूंच्या जागेवर उमेश यादव, श्रेयस अय्यर आणि शाहबाज अहमदचा स्क्वॉडमध्ये समावेश केला आहे. याबाबतची माहिती बीसीसीआयने ट्विटरवर दिली आहे.


दक्षिण आफ्रिका विरुद्ध आज २८ सप्टेंबरला तिरुवनंतपुरम येथे पहिला टी-२० सामना होणार आहे. भारत विरुद्ध आफ्रिका हा दुसरा टी-२० सामना २ ऑक्टोबरला गुवाहाटीमध्ये खेळवला जाणार आहे. तर ४ ऑक्टोबरला शेवटचा टी-२० सामना इंदौरला होणार आहे. त्यानंतर टीम इंडिया ६ ऑक्टोबरला लखनौ, ९ ऑक्टोबरला रांची आणि ११ ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिका विरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आलेली नाही.


दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडियाचा स्क्वॉड

रोहित शर्मा (कर्णधार), के एल राहुल (उप-कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आर अश्विन,युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह,हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, उमेश यादव,श्रेयस अय्यर, शाहबाज अहमद.



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies