सर्पमित्र सनी शेटे यांना पकडली ६ फुट विषारी धामण - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, November 1, 2020

सर्पमित्र सनी शेटे यांना पकडली ६ फुट विषारी धामणसर्पमित्र सनी शेटे यांना पकडली ६ फुट विषारी धामण 

माणदेश एक्सप्रेस टीम
म्हसवड : येथील सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मधिल कार्यालयात सहा फूट लांब विषारी धामण (साप) पकडून सर्प मित्र सनी शेटे यांनी धाडसी काम केले त्याबद्दल मुख्याध्यापक एम.जी. नाळे यानी त्यांचे अभिनंदन केले.

दि. ३१ रोजी दुपारच्या सुमारास शिक्षक अमोल म्हेत्रे व शिपाई नंदकुमार वनवे यांनी शाळेच्या कार्यालयात अचानक एक मोठा साप पाहिला. कार्यालयात एवढा मोठा साप पाहून त्यांची पाचावर धारण बसली. त्यांनी त्वरीत सर्पमित्र सनी शेटे याना फोनवरुन कल्पना दिली. कार्यालयात अनेक अडगळीची ठिकाणे असताना सापाला शोधून काढणे अवघड काम होते.   
गेली अनेक दिवस या सापाचे दर्शन होत होते.  त्यामुळे रात्रपाळी करताना शिपायांना भिती वाटत होती. अशा अडगळीच्या ठिकाणात सर्व कपाटे हलवून सनी शेटे यांनी शेवटी सहा फूट लांब धामण पकडली. हे करत असताना शेटे यांची चलाखी व हालचाली वाखण्यासारखी होती. यावेळी श्री. भोते, श्री. मुल्ला, अमोल म्हेत्रे, एल.के. सरतापे, बाळासाहेब सरतापे, नंदकुमार वनवे,  शंकर वनवे,  प्रणव सरतापे यांनी मदत केली.


सनी शेटे हे गेली अनेक वर्षे सर्पमित्र म्हणून काम करत आहे. त्यांनी आतापर्यंत म्हसवड व आसपास गावातील घरात निघालेले हजारो विषारी साप पकडून वनविभागात सोडले आहेत. कोणाच्याही घरात साप निघाला तर सनी शेटे हे विना मोबदला साप पकडून नेत असतात. पकडलेले  अनेक साप सर्पोद्यानात जमा करत आहेत.  कोणीही सापाला मारु नका, साप मारुन निसर्गाचा समतोल ढळू देऊ नका, म्हसवड परिसरात कोठेही साप निघाला तर  ७०८३५२९४६४ या नंबरवर संपर्क करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.  

संकलन : अहमद मुल्ला,म्हसवड 
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise