सीमाभागातील मराठी भाषिकांना पाठिंबा म्हणून राज्यातील सरकारचे काळ्या फिती बांधून कामकाज - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, November 1, 2020

सीमाभागातील मराठी भाषिकांना पाठिंबा म्हणून राज्यातील सरकारचे काळ्या फिती बांधून कामकाजसीमाभागातील मराठी भाषिकांना पाठिंबा म्हणून राज्यातील सरकारचे काळ्या फिती बांधून कामकाज

माणदेश एक्सप्रेस टीम  


आटपाडी/धिरज प्रक्षाळे :  १ नोव्हेंबर हा कर्नाटक राज्याचा स्थापन दिवस आज राज्यामध्ये सीमाभागातील मराठी भाषिकांना पाठिंबा म्हणून “काळा दिवस” म्हणून साजरा करण्यात येत आहे.


संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, या घोषणेने महाराष्ट्र दणाणून सोडला. परंतु सध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांना पाठिंबा म्हणून राज्यातील सरकारचे मंत्री व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आज काळ्या फिती बांधून कामकाज करीत असल्याचे राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट केले आहे.

 तर सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यांनी मराठी भाषादिनाचे औचित्य साधत सीमाभागातील नागरिकांना मराठी भाषादिनाच्या शुभेच्छा दिल्या. सीमाभागातील मराठी भाषिकांना पाठिंबा म्हणून काळी फित बांधत कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा आम्ही निषेध करत आहोत. बेळगाव मधील मराठी भाषिकांचा विजय होईल, याचा आम्हाला विश्वास आहे असे म्हणत सीमाभागातील मराठी बांधवाना त्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise