विवस्त्र करुन मारहाण केलेल्या गर्भवती महिलेचा झाला गर्भपात - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, November 1, 2020

विवस्त्र करुन मारहाण केलेल्या गर्भवती महिलेचा झाला गर्भपातविवस्त्र करुन मारहाण केलेल्या गर्भवती महिलेचा झाला गर्भपात 

माणदेश एक्सप्रेस टीम  


म्हसवड : दिराबरोबर शेजारी राहणाऱ्या मुलीस पळून जाण्यास मदत केल्याचा राग मनात धरून माण तालुक्यामधील एका गावातील मुलीच्या कुटुंबाने २७ वर्षिय गर्भवती महिलेस विवस्त्र करून मारहाण करून विनयभंग केल्याच्या घटनेनंतर संबंधित गुन्ह्यातील संशयित सर्वच आरोपी फरार झाल्यामुळे शोध मोहिमेनंतरही पोलिसांना त्यांना ताब्यात घेण्यास आज अखेर यश आले नाही.
दरम्यान या निंदनिय घटनेतील गर्भवती आपतग्रस्त महिलेच्या पोटी मार लागल्यामुळे संबधित महिलेस येथील एका खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले असता तिचा दुर्दैवाने गर्भपात झाल्याची घटना घडली.या मारहाणीत सहभागी झालेल्या त्याच गावातील सहा जणांच्या विरोधात म्हसवड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी संबंधिता विरोधात म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल केला होता,परंतु: या घटनेतील संशयित आरोपी फरार झाण्यास यशस्वी झाले असल्याचे निदर्शनास आले.

याबाबत अधिक माहिती अशी, संबंधित आपतग्रस्त महिला, मुलगी व सासू सासरे यांच्याबरोबर राहते. तर तिचे पती हे नोकरीनिमित्त पुण्यात राहतात,ते मधून अधून घरी येतात. सदर महिलेच्या घराशेजारीच संजय श्रीरंग तुपे हे त्यांचे कुटूबियांसोबत राहणेस आहेत. तसेच सदर महिला ही तीन महिन्याची गर्भवती आहे. सदर महिलेचा दीर अविनाश बापुराव सांळुखें याने संजय श्रीरंग तुपे यांची मुलगी रेश्मा हिच्याशी एक महिन्यापुर्वी पळून जावुन प्रेमविवाह केला आहे. त्या कारणाने संजय श्रीरंग तुपे व त्यांच्या कुटूंबातील लोक सदर महिला व तिच्या कुटूबियांना वारवार घालुन पाडुन शिवीगाळ करत असतात. ता.२५ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास संबंधित महिलेस शिवीगाळ करुन मारहाणाची प्रकार घडला होता. त्यानंतर हि भांडणे गावातील मध्यस्थीने सोडविण्याच्या दृष्टीने संशयित आरोपींनी फसवणुकीने निर्जन स्थळी माळरानात नेत तिला संपुर्ण विवस्त्र करुन पुन्हा मारहाण करण्याचा प्रकार घडला होता.
या घटनेनंतर संबंधित महिलेने म्हसवड पोलिस ठाण्यात दाद मागून फिर्याद दाखल करण्यासाठी गेली असता पोलिसांनी तिची कोणतीच दाद न घेता तिला पोलिस ठाण्यातून पिटाळून लावल्याचा प्रकार घडल्यानंतर तिने सातारा येथील जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात धाव घेऊन स्वत:वर झालेल्या अत्याचाराचा पाढा कथीत केल्यानंतर या घटनेच्या तब्बल चौथ्या दिवशी ता.२८ म्हसवड पोलिसांनी तिची फिर्याद दाखल करुन या घटनेतील सर्व संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करुन संशयित आरोपींचा शोध सुरु केला परंतु सर्वच आरोपी फरार होण्यास यशस्वी झाले.
दरम्यान या मारहाणीत संबंधित गर्भवती महिलेचा गर्भपात झाल्यामुळे हे प्रकरण आणखी चिघळले असुन पोलिसांनी संशयित आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घ्यावे अशी मागणी संबंधित आपतग्रस्त महिलेच्या गावातील विशेषत:महिलां व ग्रामस्थांनी केली आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise