Type Here to Get Search Results !

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक ईडीच्या ताब्यात




 शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक ईडीच्या ताब्यात





मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घऱी अंमलबजावणी संचालनालयचे पथक दाखल झालं असून छापेमारी सुरु केली आहे. मुंबई आणि ठाणे परिसरातील एकूण १० ठिकाणी ईडीकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. त्यानंतर प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. 





विहंग सरनाईक यांना घेऊन ईडीचं पथक निघून गेलं आहे. त्यांना चौकशीसाठी मुंबईला घेऊन येण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ईडीने  दिलेल्या माहितीनुसार, टॉप्स ग्रुपचे प्रमोटर आणि संबंधित सदस्यांजवळ सर्च ऑपरेशन सुरु आहे. यामध्ये काही राजकारण्यांचाही समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर ही कारवाई केली जात आहे. तसेच काही राजकारण्यांना नोटिसा देखील बजावण्यात आल्या आहेत. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी आणि कंगना राणौत प्रकरणात प्रताप सरनाईक यांनी आरोप-प्रत्यारोप केले होते. प्रताप सरनाईक यांचा आवाज दाबण्यासाठी ही कारवाई केल्याची चर्चा आहे. 






प्रताप सरनाईक म्हणाले की, ईडीची ही कारवाई राजकीय सुडापोटी करण्यात आली आहे. मला ईडीकडून कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती. पण तरीही छापा टाकण्यात आला आहे, असा आरोप प्रताप सरनाईक यांनी केला आहे.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies