Type Here to Get Search Results !

जम्मू काश्मीरमधील बहुचर्चीत जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठा खुलासा : अनेक बड्या नेत्यांची नावे उघडकीस




 जम्मू काश्मीरमधील बहुचर्चीत जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठा खुलासा : अनेक बड्या नेत्यांची नावे उघडकीस 





श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील बहुचर्चीत 25 हजार कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. या बड्या नेत्यांचं नाव समोर आल्यानं देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्य डेमोक्रेटिक पक्षाच्या अध्यक्षा महेबूबा मुफ्ती, नॅशनल काँफ्रेंसचे प्रमुख फारूख अब्दुल्ला यांच्यासह अनेक बड्या राजकीय नेत्यांची नावं समोर आली आहे.




जम्मू-काश्मीर हायकोर्टाच्या आदेशानुसार यूटी डमिनिस्ट्रेशन आणि सीबीआयने चौकशी केली आहे. सीबीआयच्या चौकशीनुसार,फारूख अब्दुल्ला यांनी जम्मू-श्रीनगरमध्ये रोशनी कायद्यानुसार जमिनी वितरित केल्या होत्या. फारूख अब्दुला यांनी बहीण सुरैया मट्टू यांनी देखील या रोशनी कायद्याचा लाभ मिळवून दिला होता. त्याचबरोबर फारूख अब्दुल्ला यांनी त्याच्या निकटवर्तीयांना संजवान परिसरात वनविभाग तसेच सरकारी जमिनीचा बेकायदा ताबा मिळवून दिला होता. यात नॅशनल काँफ्रेंसचे नेते सैय्यद अली अखून यांचाही समावेश आहे.




फारूख अब्दुल्ला यांनी ज्या सात कनाल जमीनवर बेकायदा ताबा मिळवला आहे, त्याची किंमत 10 कोटी रुपये आहे. या परिसरात एकूण 30 कनाल जमिनीवर बेकायदा व्यवहार झाला आहे. या जमिनीची किंमत जवळपास 40 कोटी रुपयांच्या घरात आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies