Type Here to Get Search Results !

राज्यातील शाळा सुरू : विद्यार्थ्यांची मोठ्या उत्साहात शाळेत हजेरी




 राज्यातील शाळा  सुरू : विद्यार्थ्यांची मोठ्या उत्साहात शाळेत हजेरी



पुणे : कोरोनानंतर आठ महिने बंद असलेल्या राज्यातील शाळांची पहिली घंटा सोमवारी वाजली. पहिल्या दिवशी तब्बल ९ हजार १२७ शाळा सुरू झाल्या तर २ लाख ९९ हजार विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ९४० शाळा सुरू झाल्या. दहा जिल्हांमध्ये शाळा बंद आहेत. 






मराठवाडा, विदर्भात प्रत्येकी एक हजार शाळा सुरू झाल्या. पश्चिम वऱ्हाडात विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरविली. पालकांची संमतीपत्रे मिळाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील ३२१ माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये सुरू झाले. सातारा जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद मिळाला. रत्नागिरीत ४५ टक्के शाळा सुरू झाल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १२९ माध्यमिक शाळांचे टाळे उघडलेच नाही. राज्यात नववी ते बारावीपर्यंतच्या २५,८६६ शाळा आहेत.





ऑनलाईन शिक्षणाला कंटाळलेल्या आणि घरी बसून वैतागलेल्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात शाळेत हजेरी लावली. त्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. बहुतांश सर्वच शाळांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यादृष्टीने आवश्यक काळजी घतल्याचे दिसून आले. कोरोनाचा संसर्ग होण्याची अधिक भीती नसलेल्या भागातील शाळा सुरू होत आहेत. कोरोना काळात सामाजिक व आर्थिक दूर्बल घटकातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढणे गरजेचे आहे. अन्यथा अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जाऊन शाळाबाह्य होतील. 





Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies