अनेक धार्मिक स्थळे खुली : भाविकांनी लावल्या भल्या पहाटे रांगा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 17, 2020

अनेक धार्मिक स्थळे खुली : भाविकांनी लावल्या भल्या पहाटे रांगा अनेक धार्मिक स्थळे खुली : भाविकांनी लावल्या भल्या पहाटे रांगापंढरपूर : कोविड-१९ च्या प्रकोपामुळे गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली धार्मिक स्थळे राज्य सरकारच्या आदेशानुसार सोमवारपासून उघडण्यात आली आहेत. मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर आणि हाजी अली दर्ग्यासारख्या प्रार्थना स्थळांवर भाविकांची गर्दी दिसून आली.दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर पंढरपूरचे विठ्ठुल मंदिर, शिर्डीचे साईबाबा मंदिर, उस्मानाबादच्या तुळजाभवानी मंदिरात दर्शनाची आस लावून बसलेल्या भाविकांनी भल्या पहाटे रांगा लावल्या होत्या. हाजी अली दर्ग्यावरही हीच स्थिती होती.सरकारने जारी केलेल्या मानक संचालन प्रक्रियेनुसार कोविडमुक्त क्षेत्रातील धार्मिक स्थळे उघडण्यावर भर देण्यात आला आहे. नियमांचे पालन करीत भाविकांना मंदिरांमध्ये दर्शनाची परवानगी असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळी पाडव्याचा मुहूर्त साधत धार्मिक स्थळे खुली करण्याची घोषणा केली होती. कोरोना विषाणूचा राक्षस अजूनही अस्तित्वात आहे, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे दक्षता घेण्याचे आवाहनही त्यांनी केले होते.Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise