बाळासाहेब ठाकरे यांचा आज आठवा स्मृतीदिन : “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याचे उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 17, 2020

बाळासाहेब ठाकरे यांचा आज आठवा स्मृतीदिन : “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याचे उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
बाळासाहेब ठाकरे यांचा आज आठवा स्मृतीदिन : “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याचे उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज आठवा स्मृतीदिन आहे. यावेळी राज्यभरातून शिवसैनिक दादर येथील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी अभिवादन करण्यासाठी येतात. पण कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्य शासन आणि पालिकेतर्फे देखील महत्वाची पाऊलं उचलण्यात आली आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळावर येऊ नका असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलंय.  स्मृतीस्थळावर न जाता घरातून, कार्यालयातून बाळासाहेबांना मानवंदना देण्याचं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय. कोरोनाचे संकट लक्षात घेता गर्दी टाळण्यासाठी स्मृतीस्थळावर जाऊ नका असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise