आटपाडीत महावितरणचा पोल कोसळून विद्युत वाहिन्या रस्त्यावर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, November 15, 2020

आटपाडीत महावितरणचा पोल कोसळून विद्युत वाहिन्या रस्त्यावरआटपाडीत महावितरणचा पोल कोसळून विद्युत वाहिन्या रस्त्यावर 

माणदेश एक्सप्रेस टीम 


आटपाडी/बिपीन देशपांडे : येथील बायपास रस्त्यावर महावितरणचा खांब झुकल्या ने बाजारपेठेतील अनेक दुकानांवर विद्युत वाहिन्या पडल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.

      दिवाळीच्या सणामुळे खरेदीसाठी लोक बाहेर पडत असून येथे मुख्य बाजारपेठ,फरशी पुलावर अनेक छोटे-मोठे व्यवसायिक असून ग्राहकांची गर्दी असते. तर वाहतूक कोंडी ही नित्याचीच आहे. आज सकाळी आठच्या सुमारास नेहमीप्रमाणे आटपाडीकरांची लगबग चालू होते. वाहनांची वर्दळ होती. बाजारपेठेतील बायपास रस्त्यावर असलेल्या फरशी पुलावरील कॉर्नर च्या बाजूला इलेक्ट्रिक पोल अचानक झुकल्या ने विद्युत तारा अनेक दुकाने, पानपट्टी, हॉटेल व रस्त्यावर आल्याने मोठा गदारोळ झाला. तारांचे स्पार्किंग होत असल्याने अनेक नागरिकांनी वाहने जागेवरच टाकून धूम ठोकली. याचवेळी एक दुचाकीस्वार थोडक्यात बचावला.
      सदरच्या काही विद्युत वाहिन्या लटकत होत्या तर काही रस्त्यावर आल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना वाहनांना मज्जाव करण्यात आला. पर्यायी दुसऱ्या मार्गाने वाहनांनी जाणे पसंद केले. यावेळी नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. माणदेश एक्सप्रेस च्या प्रतिनिधीने दूरध्वनीवरून महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कल्पना दिल्यावर ताबडतोबकर्मचारी सगर त्यांच्या सहकाऱ्यांनी धाव घेऊन दुरुस्ती मोहीम हाती घेतली.


      विद्युत वाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या आटपाडीच्या बाजार मंडईतील झाडाच्या फांद्या तोडण्यात आल्याने दिवसभर वीज पुरवठा खंडित होता. कोसळलेला पोल खराब झाल्याने या ठिकाणी सिमेंटचा नवीन पोल उभारून विद्युत वाहिन्या उशिरापर्यंत जोडण्याचे काम चालू होते अखेर सायंकाळी वीज पुरवठा सुरळीत झाला.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise