“जावा” प्रेमी साठी खुशखबर ; आटपाडीत कंपनीचे शोरूम सुरु - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, November 13, 2020

“जावा” प्रेमी साठी खुशखबर ; आटपाडीत कंपनीचे शोरूम सुरु“जावा” प्रेमी साठी खुशखबर ; आटपाडीत कंपनीचे शोरूम सुरु 

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/धिरज प्रक्षाळे : आटपाडी तालुक्यातील दुचाकीप्रेमी साठी प्रसिद्ध जगविख्यात दुचाकी कंपनी “जावा” चे आटपाडी शहरामध्ये शोरूम सुरु करण्यात आले असून याचे उद्घाटन आज भाजपचे प्रवक्ते व आमदार गोपीचंद पडळकर व आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य सदस्य हर्षवर्धन देशमुख, भाजपचे युवा नेते जयवंत सरगर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले.
यावेळी आटपाडी बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड, संचालक विष्णू अर्जुन, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष प्रभाकर पुजारी, इंजि. सुभाष व्हनमाने, प्रभाकर हाके, महावितरणचे सेवानिवृत्त कर्मचारी दामोदर हाके, जोगेश्वरी होंडाचे संचालक सुभाष गायकवाड, गणेश हिरोचे सुनिल हाके इंजि तानाजी निकम, अनिल हाके, बंडू हाके, गणेश हाके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी गाडीची राईड घेत गाडीची सविस्तर माहिती घेतली. प्रारंभी आमदार पडळकर यांचे स्वागत भिकाजी हाके यांनी तर हर्षवर्धन देशमुख यांचे स्वागत वसंत हाके यांनी केले. सदर गाडीची आजपासून विक्री सुरु झाली असून ग्राहकांनी अधिक माहितीसाठी कंपनीच्या आटपाडी-कराड बायपास रोडवरील श्रीनाथ टीव्हीएस शोरूम शेजारी असणाऱ्या “जावा शोरूमला” भेट देण्याचे आवाहन सांगली जिल्ह्याचे अधिकृत वितरक राहुल गणेशवाडे यांनी केले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


1 comment:

  1. "जावा" बाईक वा दुचाकी म्हणा, संगणकामध्ये "जावा" म्हणून प्रोग्राम आहे.त्याशिवाय दोन भावाच्या बायका "जावा-जावा" म्हणून विस्ताराने फलक लावावा.

    ReplyDelete

Advertise