चौंडेश्वरी पतसंस्थेकडून सभासदांना लाभांश वाटप - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, November 13, 2020

चौंडेश्वरी पतसंस्थेकडून सभासदांना लाभांश वाटपचौंडेश्वरी पतसंस्थेकडून सभासदांना लाभांश वाटप 

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/धिरज प्रक्षाळे : दीपावली निमित्त आटपाडी येथील चौंडेश्वरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्थेच्या वतीने सभासदांची दिवाळी गोड होणार असून संस्थेच्या वतीने सभासदांना लाभांश वाटप करण्यात आले आहे.आटपाडी येथील संस्थेच्या कार्यालयात सन २०१९-२० या आर्थिक वर्षातील सभासद यांना लाभांश वाटप करण्यात आले. सदरचे वाटप संस्थेचे कुटुंबप्रमुख आटपाडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य चंद्रकांत(भाऊ) दौंडे, संस्थेचे चेअरमन राजेंद्र दौंडे, व्हा.चेअरमन राहुल सपाटे, संचालक योगेश रणदिवे, सचिव बालक डोईफोडे यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले. यावेळी संस्थेचे कर्मचारी व हितचिंतक यावेळी उपस्थित होते. No comments:

Post a Comment

Advertise