चंद्रभागा नदीच्या पुलावरचे पुराचे पाणी कमी मात्र काही कालावधीसाठी पुल वाहतुकीसाठी बंद - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, October 17, 2020

चंद्रभागा नदीच्या पुलावरचे पुराचे पाणी कमी मात्र काही कालावधीसाठी पुल वाहतुकीसाठी बंद

 


चंद्रभागा नदीच्या पुलावरचे पुराचे पाणी कमी मात्र काही कालावधीसाठी पुल वाहतुकीसाठी बंद


पंढरपूर : कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आलेल्या आणि परतीच्या पावसाने सर्वत्र वादळी पाऊस झाला. वेगाने वाहणारे वारे, ढगफुटीमुळे कृष्णानदीसह ओढे-नाल्यांना जोरदार पाणी आले. उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपूर मध्ये पूर आला होता. चंद्रभागा नदी वरील तिन्ही पुलावर पुराचे पाणी होते.मात्र आता पावसाने विश्रांती घेतल्यामुळे चंद्रभागा नदीच्या पुलावर पुराचे पाणी कमी झाले आहे. असे असले तरी काही कालावधीसाठी पुल वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले.यामुळे शहरात येणारी व शहरातून जाणारे पूर्ण वाहतूक ठप्प झाली होती. परंतु शनिवारी पहाटे अहिल्यादेवी पुलावरील व जुना दगडी फुला शेजारील नवीन पुलावरील पाणी कमी झाले आहे.  तसेच हा पूल वाहतुकीसाठी वापरणे योग्य आहे की नाही याची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तपासणी करण्यात येणार आहे. पुलाच्या तपासणी नंतरच हा पूल वाहतुकीसाठी खुला करणार असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise