“एकट्यालाच घरात बसून कोरोना खातो की काय? : रावसाहेब दानवे - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, October 17, 2020

“एकट्यालाच घरात बसून कोरोना खातो की काय? : रावसाहेब दानवे

 


“एकट्यालाच घरात बसून कोरोना खातो की काय? : रावसाहेब दानवे


पैठण : मुख्यमंत्री ठाकरे हे मात्र घराबाहेर पडत नसल्याने भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. कोरोना काळात देखील मुख्यमंत्री ठाकरे घराबाहेर पडलेले नाहीत. त्यामुळं सातत्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. आता केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील मुख्यमंत्र्यांवर खरमरीत टीका केली आहे गेल्या चार पाच दिवसांत परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: हाहा:कार माजवला आहे. शेतकर्यांाचे अतोनात नुकसान झाले आहे.  


केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, अशी अनेक संकट येत राहतात. आम्ही मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं घराच्या बाहेर निघा. तर हे म्हणतात माझं कुटुंब माझी जबाबदारी.आम्ही राज्यभर फिरलो तर आम्हाला काही झालं नाही. ह्यांना एकट्यालाच घरात बसून कोरोना खातो की काय, अशा शब्दात दानवेंनी टीका केली आहे. ते म्हणाले, या स्थितीत राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  महाराष्ट्रात फिरले. मागच्या वर्षीही ते बांधावर गेले.


 राजा घराच्या बाहेर आला पाहिजे, लोकांत गेला पाहिजे. ही आपली माझं कुटुंब माझी जबाबदारी आहे, असं दानवे म्हणाले. आमच्या काळात मोबाईल नेहमी व्हायब्रेट करायचा. काही तरी मदतीचा एसएमएस यायचा. आता लोक मोबाईल उघडून पाहातो आणि खिशात ठेवतो, असंही दानवे म्हणाले.


आमच्या सरकारनं शेतकरी, गोरगरीबांना अनेक योजना दिल्या. या राज्य सरकारनं काय दिलं? असा सवाल त्यांनी केला. हे सरकार कोण चालवतंय काही कळत नाही. तिघांची तोंड तीन दिशेला असलेलं हे सरकार आहे. यांच्या काळात या राज्याचं काय होईल काही सांगता येत नाही, असं दानवे म्हणाले. हे सरकार कोण चालवतंय, कोण निर्णय घेतंय काय कळतच नाही, असं ते म्हणाले.


राजा प्रजेत गेला पाहिजे. प्रजेचं दु:ख वाटून घेतलं पाहिजे. त्या प्रजेचं कुटुंब हेच आपलं कुटुंब वाटलं पाहिजे. प्रजेच्या दु:खामध्ये सहभागी झालं पाहिजे. मात्र मुख्यमंत्री हे मी आणि माझे कुटुंब असं म्हणत घरात बसले आहेत, असं दानवे म्हणाले.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

No comments:

Post a Comment

Advertise