अमेझॉन - फ्लिपकार्ट कंपन्यांनी त्यांच्या अॅपमध्ये मराठीचा वापर करावा : मनसे - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, October 17, 2020

अमेझॉन - फ्लिपकार्ट कंपन्यांनी त्यांच्या अॅपमध्ये मराठीचा वापर करावा : मनसे

 अमेझॉन - फ्लिपकार्ट कंपन्यांनी त्यांच्या अॅपमध्ये मराठीचा वापर करावा : मनसे 

मुंबई : अॅमेझॉन - फ्लिपकार्ट कंपन्यांनी त्यांच्या अॅपमध्ये विविध सेवा, खरेदी आणि माहिती मिळवण्यासाठीच्या भाषांच्या पर्यायामध्ये मराठीला डावललं असून ही माहिती मराठीतूनही मिळण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.


अॅमेझॉनच्या अॅपवर सध्या इंग्लिशसोबतच हिंदी, तेलुगु, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या भाषांचा पर्याय उपलब्ध आहे.तर फ्लिपकार्टच्या अॅपवर हिंदी, इंग्लिश, तमिळ, तेलुगु आणि कन्नड भाषांचा पर्याय उपलब्ध आहे.


ज्या ग्राहकांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत व्यवहार करायचे आहेत, असे नवे ग्राहक ई-कॉमर्सशी जोडले गेल्यास त्याचा फायदा भारतातल्या लघु आणि मध्यम उद्योगांना आणि कारागिरांनाही होईल. यामुळे त्यांना आतापेक्षा मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल. मनसेचे पदाधिकारी अखिल चित्रे यांनी ई-कॉमर्स कंपन्यांना याविषयीची मागणी करणारं पत्रं दिलंय. याविषयीचं ट्वीटही त्यांनी केलेलं आहे. बंगळुरूमध्ये स्थित असणाऱ्या या कंपन्यांनी दक्षिणी भाषांना प्राधान्य देत महाराष्ट्रात मराठी भाषेला डावलल्याचं त्यांनी या ट्वीटमध्ये म्हणतं आंदोलनाचा इशारा दिलाय.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

No comments:

Post a Comment

Advertise