आटपाडी तालुक्यातील माण नदी व गाव ओढ्यावरील १४ पुलावर पाणी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, October 15, 2020

आटपाडी तालुक्यातील माण नदी व गाव ओढ्यावरील १४ पुलावर पाणीआटपाडी तालुक्यातील माण नदी व गाव ओढ्यावरील १४ पुलावर पाणी 

माणदेश एक्सप्रेस टीम


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार या काळात झालेल्या मुसळधार पावसामुळे आटपाडी तालुक्यातील गाव ओढ्यावरील व माण नदीवरील तब्बल १४ पुलपाण्या खाली गेले असल्याने या ठिकाणहून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

 • खालील ठिकाणच्या पुलावर पाणी
 • १) आटपाडी ग्रामपंचायती समोरील शुक्रओढा पुलावरुन २ ते अडीज फुटावर पाणी आहे.
 • २) आटपाडी ते सोनारसिध्दनगर ओढा पुल
 • ३) आटपाडी ते आंबेवाडी रोडवरील माणगंगा नदीवरील पुल 
 • ४) दिघंची ते लिंगीवरे रोडवरील माणगंगा नदीवरील पुल 
 • ५) आटपाडी ते गळवेवाडी ओढयावरील पुल 
 • ५) लिंगवरे राजेवाडी ओढयावरील पुल 
 • ६) बोबेवाडी ते खाजोडवाडी बंधारा 
 • ८) करगणी शेटफळे रोड वरील माळेवाडी जवळील पुल 
 • ९) उंबरगाव पिपंळमळा रोडवरील पुल 
 • १०) राजेवाडी तलाव 
 • ११) कौटुळी ते लोटेवाडी रस्त्यावरील पुल जोरदार पावसामुळे पावसाचे पाणी पुल 
 • १२) बोबेवाडी ते खांजोडवाडी रोडवरील माणगंगा नदीवरील पुलावरुन पाणी 
 • १३) वलवण ते खरसुंडी रोडवरील ओढा पुल 
 • १४) नेलकरंजी ते खरसुंडी रोडवरील ओढा पुल हे दोन्ही पुल पाण्याने वाहुन गेले आहेत.


वरील ओढे ,पुल व बंधाऱ्यावरुन तलावा वरुन पाणी वाहत असल्याने सदर गावाचा ऐकमेकाशी संपर्क तुटला आहे. सदर काळात पावसाचा जोर असल्या कारणाने पोलीस ठाणे कडील कर्मचारी आटपाडी-दिघंची रोड येथे बंदोबस्त कामी लावुन बॅरीकेट लावले असून पोलीस प्रशासनाकडून स्पीकर वरुन जनजागृती करण्यात येत आहे. पावसामुळे आत्तापर्यंत कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती आटपाडी पोलीस ठाणे यांचेकडून देण्यात आली आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेसNo comments:

Post a Comment

Advertise