IPL 2020 : KXIP vs RCB : अखेर पंजाबच बॉस ; रंगतदार सामन्यात आरसीबीवर विजय - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, October 15, 2020

IPL 2020 : KXIP vs RCB : अखेर पंजाबच बॉस ; रंगतदार सामन्यात आरसीबीवर विजय

 IPL 2020 : KXIP vs RCB : अखेर पंजाबच बॉस ; रंगतदार सामन्यात आरसीबीवर विजय  


शारजा : आयपीएल मधील आजच्या पंजाब विरुद्ध आरसीबी सामना रंगतदार झाला. शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर पंजाबने विजय प्राप्त करत स्पर्धेतील दुसरा सामन्यात विजय प्राप्त केला. या सामन्यात कर्णधार लोकेश राहुल (६१) व ख्रिस गेल (५३) यांनी अर्धशतके झळकावली.

नाणेफेक जिंकून विराट कोहलीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. फिंच व देवदत्त पडिक्कलने बंगळुरूला जोरदार सुरुवात करून दिली. मात्र अर्शदीपने पडिक्कलला १८ धावांवर माघारी धाडले. त्यानंतर मुरुगन अश्विनने फिंचा २० धावांवर त्रिफळा उडवला. त्यानंतर विराट कोहलीने एक बाजू लावून धरली. वॉशिंग्टन सुंदर (१३), शिवम दुबे (२३) आणि एबी डिव्हिलियर्स (२) यांना आज मोठी खेळी करता आली नाही. विराट कोहलीही ४८ धावांवर माघारी परतला. मात्र अखेरच्या षटकांमध्ये ख्रिस मॉरिस (नाबाद २५) आणि इसुरू उडाणा ( नाबाद १०) यांनी जोरदार फटकेबाजी करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला सहा बाद १७१ धावांपर्यंत मजल मारून दिली.


लक्षाचा पाठलाग करताना पंजाब चा कर्णधार लोकेश राहुल व मयांक अगरवाल यांनी पंजाबला जोरदार सुरुवात करून दिली. संघाच्या ७८ धावा झाल्या असताना मयांक अगरवाल बाद झाला. बाद होण्यापूर्वी त्याने २५ चेंडूत ३ षटकार व ४ चौकार खेचत ४५ धावा केल्या. मयांक बाद झाल्यावर यंदाचा पहिलाच सामना खेळणारा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल फलंदाजीला आला. सुरुवातीला अडखेळत खेळणाऱ्या गेल ने जम बसल्यावर मात्र जोरदार फटकेबाजी करीत ५ षटकार व १ चौकार खेचत ४५ चेंडूत ५३ धावा केल्या. संघाला विजयासाठी केवळ १ धाव पाहिजे असताना तो धावबाद झाल्याने सामना रंगतदार अवस्थेत पोहचला. सामना पुन्हा एकदा सुपर ओव्हर होईल असे वाटत असतानाच पुरन ने शेवटच्या चेंडूवर षटकार खेचत पंजाबला विजय मिळवून दिला.   


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise