एकनाथ खडसे : आज प्रवेश होणार की, मुहूर्त हुकणार - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, October 17, 2020

एकनाथ खडसे : आज प्रवेश होणार की, मुहूर्त हुकणार

 


एकनाथ खडसे : आज प्रवेश होणार की, मुहूर्त हुकणार  

जळगाव : भाजप फायरब्रँड नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा आजर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश होणार की, आजच्या मुर्हुताची संधी हुकणार हे राष्ट्रवादी आणि एकनाथ खडसे यांच्याशिवाय दुसरे कोणीच सांगून शकत नसल्याने राज्यामध्ये होणारा भूकंप सध्या तरी अजून झालेला नाही.

घटस्थापनेच्या मुहूर्तावर खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा असताना खडसे यांनीच त्याचे खंडन केले असून नुकतेच त्यांनी राज्यातील सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीविरुद्ध रावेर तालुक्यातील घटनेवरून सरकारवर टीका केल्याने भाजप सहित राष्ट्रवादीही बुचकळ्यात पडली आहे. राष्ट्रवादी प्रवेशा बाबत यांना पत्रकारांनी विचारणा केली असता, मी राष्ट्रवादीत जाणार म्हणून जे मुहूर्त सांगितले जात आहेत, ते सारे माध्यमांनी ठरविले आहेत,असे खडसे म्हणाले.  


खडसेंच्या राज्यातील महाविकास आघाडीवर केलेल्या टीकेमुळे सध्या तरी ते भाजप असून ते भाजप मध्येच राहून सक्रीय होतात दिसत आहेत. परंतु राजकारणात काही खरे नसते. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise