नीट परीक्षेत उडिसा येथील शोएब अफताब देशात पहिला ; तर राज्यातून आशीष झांट्ये प्रथम - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, October 17, 2020

नीट परीक्षेत उडिसा येथील शोएब अफताब देशात पहिला ; तर राज्यातून आशीष झांट्ये प्रथम
 नीट परीक्षेत उडिसा येथील शोएब अफताब देशात पहिला ; तर राज्यातून आशीष झांट्ये प्रथम


मुंबई : राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए)मार्फत देशातील वैद्यकीय आणि दंत अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. नीट परीक्षेत उडिसा येथील शोएब अफताब या विद्यार्थ्यांने 720 पैकी 720 गुण मिळवून देशात पहिला येण्याचा मान पटकावला आहे. तर राज्यातून आशीष झांट्ये या विद्यार्थ्यांने प्रथम क्रमांक पटकावला आहे.


देशभरातून सात लाख 71 हजार 500 विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले आहेत. कोरोनामुळे लांबणीवर गेलेली नीट परीक्षा एनटीएने 13 आणि 14 ऑक्टोबर या कालावधीत घेतली. या परीक्षेसाठी देशभरातून 15 लाख 97 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14 लाख 37 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी ज्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता आली नाही त्यांच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 14 ऑक्टोबर रोजी विशेष परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर याचा निकाल जाहीर करण्यात आला.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise