नोकरी व स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाईन मार्गदर्शन सेमिनार - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, October 15, 2020

नोकरी व स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाईन मार्गदर्शन सेमिनारनोकरी व स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाईन मार्गदर्शन सेमिनार

माणदेश एक्सप्रेस टीम


सांगली : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली यांच्यामार्फत नोकरी व स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांसाठी दि. 20 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 11 ते दुपारी 12.30 या वेळेत ऑनलाईन मार्गदर्शन सेमिनार आयोजित करण्यात आली आहे. याचा इच्छुक उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे.  
या सेमिनारमध्ये यंग प्रोफेशनल मॉडेल करिअर सेंटर ठाणे चे आशुतोष माळी How to create a interview session with condidence या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी आ. बा. तांबोळी मार्गदर्शन करणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी http://bit.ly/34Xse5T या लिंकवर नाव नोंदणी करावी. त्यानंतर सेमिनारची लिंक मेसेजव्दारे पाठविण्यात येईल, असे श्री. करीम यांनी कळविले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise