Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढला ; आज दिनांक ०७ रोजी कोरोनाचे ३२ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा बातमी सविस्तर



आटपाडी तालुक्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढला ; आज दिनांक ०७ रोजी कोरोनाचे ३२ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा बातमी सविस्तर 

माणदेश एक्सप्रेस टीम  


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात गेल्या आठवड्यात कोरोनाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे तालुक्यातील असणाऱ्या कोविड सेंटर वरचा ताण काही प्रमाणात कमी झाला होता. रुग्ण संख्या आटोक्यात आल्याने प्रशासन ही थोडे निवांत झाले होते. परंतु आज पुन्हा एकदा या संसर्गजन्य विषाणूचे तब्बल ३२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण तालुक्यात आढळून आले असल्याने प्रशासनाची धावपळ होणार आहे.


  • गावनिहाय रुग्णसंख्या 
  • शेटफळे ०२
  • नेलकरंजी ०१
  • राजेवाडी ०३
  • खरसुंडी ०२
  • लिंगीवरे ०४
  • विठ्ठलापुर ०५
  • पिसेवाडी ०२
  • काळेवाडी ०२
  • दिघंची ०३
  • आटपाडी ०८


आज आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णापैकी पुरुष रुग्ण १७ असून स्त्री रुग्ण १५ असे एकूण ३२ नवे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.साधना पवार यांनी दिली.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies