हाथरस घटनेतील नराधमांना फाशी द्या : विट्यात विविध सामाजिक संघटनेकडून प्रशासनास निवेदन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, October 7, 2020

हाथरस घटनेतील नराधमांना फाशी द्या : विट्यात विविध सामाजिक संघटनेकडून प्रशासनास निवेदनहाथरस घटनेतील नराधमांना फाशी द्या : विट्यात विविध सामाजिक संघटनेकडून प्रशासनास निवेदन 

माणदेश एक्सप्रेस टीम  


विटा : माण- खटाव मध्ये कार्यरत असणाऱ्या विविध संघटना व संस्था यांच्यावतीने उत्तरप्रदेशमधील हाथरस या घटनेतील बहूजन समाजातील तरूणीवर चार नराधमांनी सामूहिक अत्याचार केले. परंतु उपचार चालू असतानाच या तरूणीने जीव गमावला.ही घटना मानवतेस काळीमा फासणारी आहे. या देशात महिला सुरक्षीत नाहीत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्यामुळे सादर घटनेत सामील असलेल्या सर्व आरोपींवर सक्त कारवाई करावी व त्यांना फाशीची शिक्षा करावी यामुळे असे विकृत अपराध करणाऱ्यावर वचक बसेल व माता भगिनींना न्याय मिळेल अशा आशयाचे निवेदन निवेदन नायब तहसीलदार विलास करे यांना देण्यात आले.


यावेळी माजी सभापती बाळासाहेब रणपिसे, कोरो इंडिया विभागीय समन्वयक सचिन लवटे, महिला संघटीका, सौ.भारती पवार, जिल्हा समन्वयक, संतोष रणदिवे, करिश्मा जाधव, विक्रम गायकवाड, मैत्रीय फाऊंडेशन च्या अध्यक्षा माधुरी भोसले, रिद्धी सिद्धी संस्थेचे विजय काळेल, एकनाथ वाघमोडे, सारिका गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise