40 ते 69 वयोगटातील लोकांना कोरोनाचा सर्वाधिक फटका; मृत्यूचं प्रमाणही जास्त ; अहवालातून आला निष्कर्ष आला समोर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, October 2, 2020

40 ते 69 वयोगटातील लोकांना कोरोनाचा सर्वाधिक फटका; मृत्यूचं प्रमाणही जास्त ; अहवालातून आला निष्कर्ष आला समोर40 ते 69 वयोगटातील लोकांना कोरोनाचा सर्वाधिक फटका; मृत्यूचं प्रमाणही जास्त ; अहवालातून आला निष्कर्ष आला समोर 


नवी दिल्ली : आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या दोन राज्यातील कोरोनाबाधित रूग्ण आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा अभ्यास करून संशोधकांच्या एका टीमने कोरोनासंबंधी मोठ्या प्रमाणावर माहिती गोळा करून त्याचे विश्लेषण केले आहे. त्यातून असं दिसून आले आहे की, 40 ते 69 वयोगटातील लोकांना कोरोनाची सर्वात जास्त लागण झाली आहे आणि मृत्यूचेही प्रमाण याच वयोगटात सर्वाधिक आहे.


एकूण कोरोनाग्रस्त रूग्णांपैकी 10 टक्के कोरोना रूग्णांनी सुपरस्प्रेडर्स म्हणून काम केले आहे. त्यांच्यामुळे जवळपास 60 टक्के नविन रूग्णांची तयार भर पडली आहे. तर 70 टक्के कोरोनाग्रस्त रूग्णांनी कोणताही प्रसार केला नसल्याचे हा अभ्यास सांगतो. ’सुपरस्प्रेडर्स’ म्हणजे असे अल्पसंख्य रूग्ण ज्यांनी मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रसार केला आहे. हा अहवाल बुधवारी ’सायन्स’ या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.


वॉशिग्टनस्थित सेंटर फॉर डिसिज डायनॅमिक्स, इकॉनॉमिक्स ॲन्ड पॉलिसीचे संचालक रामाणन लक्ष्मीनारायण यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांनी आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या दोन राज्यांतील कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यापासून ते 1 ऑगस्ट या काळादरम्यान कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा अभ्यास करून हा अहवाल तयार केला आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजNo comments:

Post a Comment

Advertise