आणखी एका भारतीय फलंदाजाची कमाल ; आयपीएल मध्ये केला ५००० धावांचा टप्पा पूर्ण - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, October 2, 2020

आणखी एका भारतीय फलंदाजाची कमाल ; आयपीएल मध्ये केला ५००० धावांचा टप्पा पूर्णआणखी एका भारतीय फलंदाजाची कमाल ; आयपीएल मध्ये केला ५००० धावांचा टप्पा पूर् ण 


दुबई : आणखी एका भारतीय फलंदाजाची कमाल केली असून आयपीएल मध्ये त्याने ५००० धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने आयपीएलच्या तेराव्या हंगामात एका विक्रमाला गवसणी घातली. रोहित आयपीएलमध्ये 5 हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा तिसरा भारतीय ठरला आहे. हा टप्पा पूर्ण करण्यासाठी रोहितला अवघ्या 2 धावांची गरज होती. त्याने पंजाबविरुद्धच्या सामन्यात चौकार खेचत हा विक्रम नोंदवला .


रोहितच्या आधी आयपीएलमध्ये पाच हजार धावांचा टप्पा बंगळुर चा कर्णधार विराट कोहली आणि सुरेश रैना या भारतीय खेळाडूंनी पार केला आहे. विराटने 180 तर रैनाने 193 सामन्यात 5 हजाराचा टप्पा पार केला. तर रोहितने 192 सामन्यात खेळताना हा विक्रम नोंदविला.


 • आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे दहा फलंदाज 
 • विराट कोहली - 180 सामने, 5430 धावा
 • सुरेश रैना - 193 सामने, 5368 धावा
 • रोहित शर्मा - 192 सामने, 5000 धावा
 • डेव्हिड वॉर्नर - 129 सामने, 4793 धावा
 • शिखर धवन - 162 सामने, 4648 धावा
 • एबी डिव्हिलियर्स - 157 सामने, 4529 धावा
 • ख्रिस गेल - 125 सामने, 4484 धावा
 • महेंद्रसिंह धोनी - 193 सामने, 4476 धावा
 • रॉबिन उथप्पा - 180 सामने, 4427 धावा
 • गौतम गंभीर - 154 सामने, 4217 धावा


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise