आटपाडीच्या शुक्र ओढ्याच्या पुलावर बेवारस पडलेल्या लाकडी ओंडक्यांची व चिलारीच्या झाडांची नेमकी जबाबदार कुणाची? सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग कधी येणार : राजेंद्र खरात - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, October 2, 2020

आटपाडीच्या शुक्र ओढ्याच्या पुलावर बेवारस पडलेल्या लाकडी ओंडक्यांची व चिलारीच्या झाडांची नेमकी जबाबदार कुणाची? सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग कधी येणार : राजेंद्र खरातआटपाडीच्या शुक्र ओढ्याच्या पुलावर बेवारस पडलेल्या लाकडी ओंडक्यांची व चिलारीच्या झाडांची नेमकी जबाबदार कुणाची? सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग कधी येणार : राजेंद्र खरात 

माणदेश एक्सप्रेस टीम  


आटपाडी/धिरज प्रक्षाळे : आटपाडी तालुक्यात दमदार पाऊसाने सुरुवात केली आहे. मागील १५ दिवसापूर्वी झालेल्या पावसाने तालुक्यातील अनेक रस्ते वाहून गेले तर अनेक पुल खचले त्यामुळे दळण-वळण यंत्रणा ठप्प झाली होती. आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. प्राजक्ता कोरे व उपाध्यक्ष पप्पू उर्फ शिवाजी डोंगरे यांनी तालुक्याचा दौरा करून रस्त्यांची व पिकांची झालेली पाहणी करून अधिकाऱ्यांना नुकसान झालेली पिकांची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले तर रस्याच्या कामाबाबत तात्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या.


तर दिनांक २९ सप्टेंबरच्या रात्री आटपाडी तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या पावसाने आटपाडीच्या शुक्र ओद्याला रात्रीच्या सुमारास मोठा पूर आला होता. या पुराने आटपाडी बाजार पटांगण येथील आटपाडी-दिघंची मार्गावर असणाऱ्या पुलावर देखील पाणी आले होते. या पुराच्या पाण्यात वाहून आलेले लाकडी ओंडके हे या पुलावर अडकून बसले आहेत तर काही लाकडी ओंडके व चिलारीची झाडे ही या पुलावरील रस्त्यावर अजून पडलेली आहेत.


गेली २ दिवस झाले या लाकडी ओंडक्यामुळे वाहतुकीला अडचण होत असून ही याकडे प्रशासनाचे लक्ष गेले नाही. तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम खाते हे तर झोपलेलेच असल्याचे दिसून येत आहे. याच पुलावरून तालुक्याचे तहसीलदार, प्रांताधिकारी, गावाचे सरपंच, पोलीस निरीक्षक हे ये-जा करीत असतात परंतु त्यांना ही अजून लाकडी ओंडके व रस्त्यावरील आलेली चिलार झाडे यांना दिसत नाही का? असा सवाल आरपीआयचे तालुकाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी केला आहे. तर पुलाच्या दोन्ही बाजूला फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांनाही याचे काही देणे-घेणे नाही.    


त्यामुळे सदर पुलावरील लाकडी ओंडके व चिलारीची झाडे प्रशासन कधी हटवणार व वाहतुकीचा होणारा अडथळा कधी दूर करणार याकडे आटपाडीकरांचे लक्ष लागले आहे.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise