दामाजीचा रविवारी गळीत हंगाम शुभारंभ - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, October 24, 2020

दामाजीचा रविवारी गळीत हंगाम शुभारंभ

समाधान आवताडे मंगळवेढा


दामाजीचा रविवारी गळीत हंगाम शुभारंभ

माणदेश एक्सप्रेस टीम


मंगळवेढा/प्रतिनिधी : येथील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचा सन 2020-21 सालच्या 28 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ रविवार दिनांक 25 ऑक्टोंबर 2020 रोजी सकाळी ठीक 11.15 वाजता विजयादशमीचे शुभमुहुर्तावर चेअरमन समाधान महादेव आवताडे, शुभहस्ते आणि व्हा.चेअरमन अंबादास चिंतामणी कुलकर्णी यांचे अध्यक्षतेखाली व कारखान्याचे मार्गदर्शक संचालक बबनराव बाबुराव आवताडे यांचे उपस्थित होणार आहे.


कार्यक्रमाच्या सुरुवातीस कारखान्याचे संचालक लक्ष्मण एकनाथ जगताप व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. जयश्री लक्ष्मण जगताप या उभयतांचे शुभहस्ते सकाळी ठीक 9.00 वाजता श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे. अशी माहिती कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांनी दिली.
यावर्षीच्या हंगामासाठी कारखान्याच्या मशिनरीची साफसफाई व सर्व दोष दुरुस्तीची कामे पूर्ण झाली असून दररोज 4000 मे.टन ऊस गाळप होईल इतकी ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा भरती केली आहे. यावर्षी संचालक मंडळ, शेतकरी व कामगार यांचे सहकार्याने सहा लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यांत आलेले आहे. कार्यक्षेत्रात ऊसाचे क्षेत्र चांगले असुन शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या या कारखान्यास फारसा ऊस कमी पडणार नाही असा विश्वास चेअरमन समाधान आवताडे यांनी व्यक्त केला असून गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमास सर्व शेतकरी, सभासद, हितचिंतक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन ही समाधान आवताडे यांनी केले आहे.Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस 


No comments:

Post a Comment

Advertise