पश्चिम महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांसाठी हरिदास लेंगरे यांचे फार मोठे योगदान - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, October 24, 2020

पश्चिम महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांसाठी हरिदास लेंगरे यांचे फार मोठे योगदान

हरिदास लेंगरे


पश्चिम महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांसाठी हरिदास लेंगरे यांचे फार मोठे योगदान

माणदेश एक्सप्रेस टीम  


सांगली : सांगली जिल्ह्यातील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कष्टकऱ्यांच्या प्रश्नावरती सातत्याने झटणारे, कष्टकऱ्यांच्या प्रश्नासाठी आवाज उठवणारे हरिदास लेंगरे यांचे पश्चिम महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांसाठी फार मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन सचिन ऐवळे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र जनविकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन च्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना तसेच हमाल, वीट कामगार, केस कामगार, घरेलू मोलकरिन, शेतकरी, ऊस तोड कामगार, माथाडी मापाडी हमाल यांना संघटित करून न्याय देण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत.  


सांगली जिल्ह्यातील १६ सहकारी साखर कारखान्याची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात २८/१२/२०१८ रोजी संपन्न झाली. या ऊसतोड कामगारांच्या बैठकीत अनेक प्रश्नावर महत्त्वपूर्ण निर्णय झाले. सांगली, सोलापूर, सातारा या जिल्ह्यातील दुष्काळी भागातील आटपाडी, जत, कवठेमंकाळ, सांगोला, मंगळवेढा, माण तालुका या भागात ऊसतोड मजूर मोठ्या प्रमाणात आहे. तसेच मुकादम, ऊसतोड वाहतूकदार यांना संघटित करून वारंवार ठिकठिकाणी बैठक घेऊन त्यांच्या प्रश्नावर वाचा फोडण्याचे काम आणि या सर्व घटकांना न्याय देण्यासाठी फार मोठा संघर्ष हरिदास लेंगरे यांनी केला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व ऊसतोड कामगारांसाठी हरिदास लेंगरे यांचे फार मोठे योगदान आहे. जागोजागी ऊस तोडी फडामध्ये भेटी देऊन कामगारांमध्ये त्यांनी जनजागृती केली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार हरिदास लेंगरे यांच्याकडे मोठ्या आशेने बघत आहे. .Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise