Type Here to Get Search Results !

धम्मचक्र प्रवर्तन दिन घरीच साधेपणाने साजरा करा : राजेंद्र खरात



धम्मचक्र प्रवर्तन दिन घरीच साधेपणाने साजरा करा : राजेंद्र खरात 

माणदेश एक्सप्रेस टीम


आटपाडी/धिरज प्रक्षाळे :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगून यावर्षी अनुयायांनी धम्मचक्र प्रवर्तन दिन घरीच साधेपणाने साजरा करावा. घरातच तथागत गौतम बुद्ध तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना करावे असे आवाहन फुले शाहू आंबेडकर विचारमंचचे संस्थापक अध्यक्ष तथा आरपीआयचे आटपाडी तालुकाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी केले आहे.


 


यावेळी ते म्हणाले, आपल्या कुटुंबासोबत घराघरात अभिवादन करावे. यावर्षी कोरोना महामारीच्या प्रादुर्भावाची झळ देशासह संपूर्ण जगाला बसत आहे. यामुळे केंद्र व राज्य शासनाने नागरिकांनी कोणतेही सण, समारंभ सामूहिकरित्या साजरे करु नये, असे आवाहन केले आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी येथे बौध्द धम्माची दीक्षा घेतली होती. त्या दिवशी विजयादशमीचा सण होता. मात्र यंदा कोरोना संक्रमणापासून बचावासाठी नागरिकांनी आपल्या घरीच धम्मचक्र प्रर्वतन दिन साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies