Type Here to Get Search Results !

आटपाडी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत राडा ; सदस्याने प्रोसिडिंग नेल्याचा सरपंच यांचा आरोप तर सदस्यांनी दिलेले निवेदन सरपंच यांनी फाडल्याचा सदस्यांचा आरोप




आटपाडी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत राडा ; सदस्याने प्रोसिडिंग नेल्याचा सरपंच यांचा आरोप तर सदस्यांनी दिलेले निवेदन सरपंच यांनी फाडल्याचा सदस्यांचा आरोप 

माणदेश एक्सप्रेस टीम  


आटपाडी/धिरज प्रक्षाळे : आटपाडी ग्रामपंचायतीच्या आज झालेल्या मासिक सभेत मध्ये मोठा गोंधळ झाला. यामध्ये सदस्य प्रदीप लांडगे यांनी प्रोसिडिंग नेल्याचा आरोप सरपंच यांनी केला तर विरोधी सदस्यांनी ग्रामविकास अधिकारी यांचेकडे दिलेले निवेदन सरपंच यांनी फाडल्याचा आरोप सदस्यांनी केल्यामुळे मासिक मोठा वाद निर्माण झाल्याने एकमेकाकडे हातवारे करून आरोप-प्रत्यारोप करण्यात आले.


आटपाडी ग्रामपंचायतीची मासिक सभा दिनांक ही दिनांक २९ रोजी होणार होती. परंतु त्या दिवशी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचा आटपाडी तालुका दौरा असल्याने सदर दिवशी होणारी सभा तहकूब करण्यात आली व ती आज दिनांक ३१ रोजी घेण्यात आली. परंतु आज होणाऱ्या सभेचे कोणतेही नोटीस ग्रामविकास अधिकारी यांनी काढली नसल्याने उपसरपंच प्रा.डॉ.अंकुश कोळेकर यांनी त्यास आक्षेप घेतला व याबाबत त्यांनी ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन दिले. परंतु सदरचे निवेदन हे सरपंच यांनी फाडून टाकल्याने सर्वच सदस्य अवाक झाले. तर मागील मासिक सभेमध्ये झालेळे ठराव चालू हे प्रोसिडिंगमध्ये नसल्याने सदस्य प्रदीप लांडगे यांनी आक्षेप नोंदवत सभा प्रोसिडिंग आपल्या ताब्यात घेतल्याने पुन्हा गोंधळ निर्माण झाला. यावेळी दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोप करण्यात आले.





यावेळी महिला सदस्या सौ. रेखा ऐवळे यांनी मागासवर्गीय सदस्यांना विश्वासात घेत नसल्याने जाब विचारला. तर रस्ता केला नसतानाही व ग्रामसेवक रजेवर असताना बिले काढल्याचा आरोप सदस्य प्रदीप लांडगे यांनी केला. त्यामुळे आजची आटपाडी ग्रामपंचायतीची झालेली मासिक सभा वादळी झाली.   



Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies