म्हसवड मधील कोरोना योध्याचे कोरोनाने निधन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, October 1, 2020

म्हसवड मधील कोरोना योध्याचे कोरोनाने निधनम्हसवड मधील कोरोना योध्याचे कोरोनाने निधन

माणदेश एक्सप्रेस टीम


म्हसवड/अहमद मुल्ला :  गेले सात महिन्यापासुन म्हसवड व पालिका हद्दीत कोरोना या महामारीला म्हसवड मधून हद्दपार करण्यासाठी म्हसवड पालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचारी वर्गानी एक दिवस हि सुट्टी न देता शहर कोरोना पासुन दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र जिल्ह्यातच संख्या वाढल्याने म्हसवडची हि संख्या एकीकडे वाढती गेली तर दुसरीकडे मृत्यूदर हि वाढती गेला होता.


या मृत्यूचे अंत्यसंस्कार करण्यासाठी म्हसवड पालिकेने एक पाच कर्मचारी यांची टिम तयार केली होती. या टिम मधील पालिकेचे कायमस्वरुपी कामगार विनोद शामराव सरतापे यांनी परवा पर्यंत २३ कोरोना पॉझिटिव्ह मृत देहाचा अंत्यविधी माणगंगा नदी पात्रात केला. त्या विनोदला केव्हा या महामारीने घेरले हेच या कोरोना योध्द्याला उमगले नाही आणि या योध्द्याचा सोमवारी रात्री १० वाजता निधन झाले. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होती आहे.


लहान वयात आई वडिलांचे छत्र हरवले, मोठ्या बहिणीने लहाणाची मोठी तीन भावंडे केली. विनोद सरतापे याला पालिकेने आईच्या जागेवर कामावर घेतले. हळवा स्वभाव, मृद भाषा कोणी हि काम सांगा सर्वाचे काम करणारा, जवाबदारी ने काम करणारा कर्मचारी म्हणून विनोदकडे पाहिले जात होते. काही दिवस अग्नीशमन गाडीवर काम केल्या नंतर मार्च मध्ये सुरु झालेली कोरोना व्हायरस महामारीत म्हसवड व परिसरातील आणि म्हसवड पोलिस स्टेशन हद्दीतील पॉझिटिव्ह रुग्णाचे निधन झाले तर पालिकेने त्याचा अंत्यसंसकार करण्याचा जिल्हाधिकारी यांनी आदेश काढल्यावर मार्च २०२० पासुन आज पर्यंत  २३ कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या मृतदेहांना अग्नी देण्याचे काम म्हसवड पालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कोरोना योद्ध्यांनी दिवस रात्र रविवार सुट्टीचा दिवस न पहाता केवळ माणुसकीच्या नात्याने काम करणाऱ्या या कोरोना योध्द्यांच्या टिम मधील विनोद सरतापे या योध्याचे निधन सोमवारी रात्री १० च्या दरम्यान झाले.  


 या योध्द्याच्या जाण्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केले तर पालिकेचे मुख्याधिकारी सचिन माने यांनी दु:ख व्यक्त करत विनोद सरतापे यांना शासनातर्फे जी मदत देता येईल त्यासाठी पालिका व स्वत: मी प्रयत्न करतार असल्याचे सांगितले. युवराज सुर्यवंशी, सागर सरतापे, दादा सरतापे, गणेश चव्हाण, राजेश चव्हाण, समीर सरतापे, अरुण सरतापे, शरद वाघमारे, विजय लोखंडे या कोरोना योध्द्यांच्या टिमने त्यांना श्रध्दांजली वाहिली.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise