Type Here to Get Search Results !

लॉकडाऊनच्या मुदतीत 31 ऑक्टोबरपर्यंत वाढ ; जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आदेश केले जारी

जिल्हाधिकारी  डॉ. अभिजीत चौधरी


लॉकडाऊनच्या मुदतीत 31 ऑक्टोबरपर्यंत वाढ ; जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आदेश केले जारी 

माणदेश एक्सप्रेस टीम


सांगली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्य शासनाकडील दि. 30 सप्टेंबर 2019 रोजीच्या पत्रान्वये दिलेल्या निर्देशानुसार सांगली जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत दिनांक 31 ऑक्टोबर 2020 रोजीचे रात्री 12 वाजेपर्यंत वाढविण्यात आली असल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केले आहेत.


कंटेनमेंट झोन - दिनांक 19 व 21 मे 2020 रोजीच्या आदेशानुसार जिल्ह्यामध्ये तयार करण्यात येत असलेले कंटेनमेंट झोन पुढील आदेशापर्यंत कायम राहतील. केंद्र शासन व राज्य शासनाने वेळोवेळी कंटेनमेंट झोन तयार करण्याविषयी दिलेल्या सर्व सुचना पुढील आदेशापर्यंत कायम राहतील.


प्रतिबंधित / बंद क्षेत्रे पुढीलप्रमाणे -  शाळा, कॉलेज, शैक्षणिक / प्रशिक्षण/शिकवणी देणाऱ्या संस्था इत्यादी हे 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत प्रतिबंधीत असतील. तथापि ऑनलाईन / दुरस्थ शिक्षणास परवानगी असेल. चित्रपटगृहे, जलतरण तलाव, मनोरंजन पार्कस, प्रेक्षागृहे आणि सभागृहे, नाट्यगृहे (मॉल व मार्केट कॉम्प्लेक्स मध्ये असणाऱ्या नाट्यगृहांसह) ऑडिटोरियम, असेंब्ली हॉल यासारखे तत्सम सर्व ठिकाणे प्रतिबंधीत असतील. एमएचए ने परवानगी दिलेल्या व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक, मेट्रो रेल, सर्व सामाजिक / राजकीय /क्रिडा/ करमणूक / शैक्षणिक / सांस्कृतिक / धार्मिक कार्यक्रम तसेच इतर मेळावे प्रतिबंधीत असतील.


सर्व प्रकारची जीवनावश्यक वस्तू असलेली दुकाने / आस्थापना या पुर्वी दिलेल्या आदेशामध्ये नमुद असल्याप्रमाणे यापुढेही सुरू राहतील. यापूर्वी वेळोवेळी परवानगी दिलेल्या बाबी / क्षेत्र पुर्ववत सुरू राहतील आणि यापूर्वी दिलेले आदेश या आदेशास संलग्न राहतील आणि हे आदेश दि. 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत अस्तित्वात राहतील.


पुढील बाबींना / क्षेत्रांना सशर्त परवानगी असेल - हॉटेल्स / फूड कोर्टस / रेस्टॉरंट आणि बार दि. 5 ऑक्टोबर 2020 पासून आस्थापनेच्या क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेसह सुरू राहतील. या आस्थापना सुरू करण्यासाठी घ्यावयाच्या आवश्यक दक्षतेबाबत पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडून सविस्तर मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या जातील.


ऑक्सिजन उत्पादन व वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या हालचालीस राज्यात व राज्याबाहेर कोणत्याही प्रकारचे वेळेचे बंधन असणार नाही. राज्य शासन व केंद्र शासनाने वेळोवेळी दिलेल्या कोविड-19 बाबतच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे राज्यांतर्गत रेल्वे सेवा सुरू करण्यात येत आहे.


यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या क्रिया / बाबी नेमून दिलेल्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे (SOP) चालू राहतील. बंदी आदेशातून सुट दिलेल्या सर्व सेवा व आस्थापनांमध्ये वावरणाऱ्या सर्व व्यक्तींनी पूर्ण वेळ मास्क, सॅनिटायझर व सुरक्षीत अंतर इत्यादी बंधने पाळणे आवश्यक आहे.


या आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधीक्षक, Incident Commander तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी व सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी करावी.  या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केले आहेत.


कोव्हीड 19 विषाणू व्यवस्थापनाबाबत राष्ट्रीय दिशानिर्देश - सर्व नागरिकांना सार्वजनिक तसेच कामाच्या ठिकाणी मास्क, चेहरा झाकावयाचे साधन वापरणे बंधनकारक असेल. सर्व सार्वजनिक ठिकाणी तसेच वाहतुकीदरम्यान सर्व नागरिकांनी सामाजिक अंतराचा निकष पाळणे बंधनकारक असेल. दुकानामध्ये/ दुकान परिसरामध्ये 5 पेक्षा जास्त व्यक्ती / गिऱ्हाईक यांना प्रतिबंध असेल. तसेच उपस्थित असलेल्या व्यक्ती / गिऱ्हाईकां मध्ये 6 फुटापेक्षा जास्त अंतर राखणे बंधनकारक असेल. विवाह कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त 50 नातेवाईक / नागरिक यांना सामाजिक अंतराचे निकष पाळून हजर राहण्यास परवानगी असेल. अंत्यसंस्कारासाठी जास्तीत जास्त 20 नातेवाईक / नागरिक यांना सामाजिक अंतराचे निकष पाळून हजर राहण्यास परवानगी असेल. राज्य तसेच स्थानिक प्राधिकरणाव्दारे करण्यात आलेल्या नियमानूसार तसेच कायद्यामध्ये नमूद असलेल्या तरतूदीनूसार सार्वजनिक ठिकाणी तसेच कामाच्या ठिकाणी थुंकणे हे दंडनिय असेल. सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ खाण्यास व थूंकण्यास परवानगी असणार नाही.


कामाच्या ठिकाणाबाबत अतिरिक्त दिशानिर्देश - शक्यतोवर काम हे घरातून करणे विषयीची बाब पाळण्यात यावी. कार्यालये/ आस्थापनामधील सर्व प्रवेश व बाहेर पडण्याच्या ठिकाणी तसेच कार्यालयातील सार्वजनिक ठिकाणी थर्मल स्कॅनिग/ हँड वॉश/ सॅनिटायझर हे उपलब्ध करून देणे. कामाच्या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक वापराचे ठिकाणे तसेच सर्व गोष्टी ज्या मानवी संपर्कामध्ये उदा. दरवाज्याचे हॅण्डल, इत्यादी तसेच सतत हाताळली जाणाऱ्या बाबींची पुन्हा पुन्हा निर्जंतुकीकरण करण्यात यावे.  कामाच्या ठिकाणी सर्व नागरिकांनी कामागारामधील पुरेसे अंतर, कामाच्या वेंळादरम्यान पुरेसे अंतर त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या जेवणाच्या वेळामध्ये सामाजिक अंतराचा निकष पाळला जावा.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies