सायली चव्हाण खून प्रकरण ; आरोपींना आणखी तीन दिवस पोलीस कोठडी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, October 1, 2020

सायली चव्हाण खून प्रकरण ; आरोपींना आणखी तीन दिवस पोलीस कोठडीसायली चव्हाण खून प्रकरण ; आरोपींना आणखी तीन दिवस पोलीस कोठडी 

माणदेश एक्सप्रेस टीम


आटपाडी/प्रतिनिधी : सोनारसिद्ध नगर (पुजारवाडी) येथील सायली अक्षय चव्हाण हिच्या खून प्रकरणातील तिघा आरोपींना तीन दिवस पोलिस कोठडी वाढवून देण्यात आली आहे.


सायली चव्हाण हिचा चाकूने गळा कापून खून करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी पती अक्षय गोरख चव्हाण, अंकित कुमार विजय पालसिंग, रणजीत लालसिंग या तिघांना पोलिसांनी खून प्रकरणात अटक केली होती, त्यांना एक ऑक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती, त्याची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर केले न्यायालयाने त्यांना अजून तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.


सायलीचा खून करण्यासाठी वापरण्यात आलेला चाकू जप्त केला आहे. संशयितांनी खून प्रकरणांमध्ये वापरलेले कपडे जप्त केले आहेत. या प्रकरणातील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगा यास सांगलीच्या दादू भिडे या सुधारगृहात रवानगी केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील करीत आहेत.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise