निमगाव येथे शेतकऱ्यांना विविध खत पद्धतींचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, September 19, 2020

निमगाव येथे शेतकऱ्यांना विविध खत पद्धतींचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शननिमगाव येथे शेतकऱ्यांना विविध खत पद्धतींचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन

माणदेश एक्सप्रेस टीम  


सदाशिवनगर/वार्ताहर : निमगाव (ता. माळशिरस) येथे आपल्या शिक्षणाचा शेतकऱ्यांना उपयोग व्हावा म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी सलन्ग्नित रत्नाई कृषी महाविद्यालय अकलुज येथील कृषीदूत विशाल चंद्रकांत कवटे याने `ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम`अंतर्गत शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दाखवले.  


यामध्ये रिंग पद्धतीने फळ पिकांना खत कसे घालावे याचे प्रात्यक्षिक केले. त्याचबरोबर माती परीक्षण करून आपण आपल्या जमिनीमध्ये कोणत्या घटकांची कमतरता आहे हे जाणून घेऊ शकतो हे दाखविले. सध्याच्या आधुनिक तंत्रद्यानाच्या युगात आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी प्रोत्साहन देऊन विविध प्रकारचे मोबाईल व त्यांचा वापर कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले.  


हे प्रात्यक्षिक करताना त्यास शिक्षण प्रसारक मंडळ अकलुज चे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, महाविद्यालायचे समन्वयक डॉ.डी.पी.कोरटकर, प्राचार्य प्रा.आर.जी.नलावडे, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.एस.एम.एकतपुरे, कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.आर.अडत, प्रा.डी.एस.ठवरे, प्रा.डी.एस.मेटकरी याचे मार्गदर्शन लाभले.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise