म्हसवड येथे लोकसहभागातून उभा राहणाऱ्या कोविड हॉस्पिटल सेंटर साठी मुस्लिम समाज बांधवा कडून २१००० हजार रुपयांची मदत - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, September 19, 2020

म्हसवड येथे लोकसहभागातून उभा राहणाऱ्या कोविड हॉस्पिटल सेंटर साठी मुस्लिम समाज बांधवा कडून २१००० हजार रुपयांची मदतम्हसवड येथे लोकसहभागातून उभा राहणाऱ्या कोविड हॉस्पिटल सेंटर साठी मुस्लिम समाज बांधवा कडून २१००० हजार रुपयांची मदत 

माणदेश एक्सप्रेस टीम   


म्हसवड/अहमद मुल्ला : म्हसवड मुस्लिम समाज बांधव (जुम्मामशिद) म्हसवड यांचेकडून म्हसवड येथे लोकसहभागातून उभा राहणाऱ्या कोविड हॉस्पिटल सेंटर साठी २१००० रुपयाची मदत देण्यात आली.


म्हसवड येथे नागरिकांच्या सहकार्यातून सामान्य नागरिकांना १५ बेडचे मोफत कोरोना केअर सेंटर सुरू केले जात असुन या कोरोना केअर सेंटरसाठी आवश्यक साधनांसाठी नागरिकांनी स्वयंफूर्तीने आर्थिक मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.

स्थानिक पातळीवर अत्यवस्थ रुग्णास मोफत उपचार अंतर्गत १५  ऑक्सिजन बेडचे हॉस्पिटल येथील लांबमळा नजिकच्या शासकीय वस्तिगृह इमारतीत ऊभारण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला असुन या इमारतीत १५ बेडला ऑक्सिजन पुरवठा करणारी यंत्रणेचे काम तातडीने पुर्ण करण्यात आले आहे. या उपक्रमास  आपलाही खारीचा वाटा म्हणून जुम्मा मशिदीमधील काही मुस्लिम बांधवानी  स्वयंफूर्तीने एकवीस हजार रुपयाची मदत आम्ही म्हसवडकर कार्यकर्त्याच्या  हातात सुपूर्त केली.

याप्रसंगी  मौलाना हाफिज अशरफ  शौकत मु्ल्ला, नगरसेवक अकिल काझी, रफिक मुल्ला, सोहेल मुल्ला, इम्रान मुल्ला जहांगीर तांबोळी, फिरोज तांबोळी, आरिफ तांबोळी, सुलतान नदाफ, पत्रकार अहमद मुल्ला, नगरसेवक युवराज सुर्यवंशी कैलास भोरे, राहूल मंगरुळे, डॉ राजेश शहा  आदी मान्यवर उपस्थित होते.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise