नरेंद्र मोदींसारख्या स्वार्थी नेत्याची देशाला गरज नाही ; या नेत्याची मोदींवर टिका - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, September 19, 2020

नरेंद्र मोदींसारख्या स्वार्थी नेत्याची देशाला गरज नाही ; या नेत्याची मोदींवर टिकानरेंद्र मोदींसारख्या स्वार्थी नेत्याची देशाला गरज नाही ; या नेत्याची मोदीं वर टिका


मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एखदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केली आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशनात लॉकडाउनदरम्यान किती कामगार स्थलांतरीत झाले तसेच किती कामगारांचे मृत्यू झाले? असा प्रश्न विरोधी पक्षाने लोकसभेत सरकारला विचारला. यावर सरकारनं आपल्याकडे याची माहिती नसल्याचं आश्चर्यकारक उत्तर दिलं आहे. यावरूनच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या स्वार्थी नेत्याची देशाला गरज नाही, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. मोदी सरकारला किती स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला हे ठाऊक नाही. तसंच ज्या डॉक्टरांना कोरोना योद्धे अशी उपमा देऊन त्यांच्यासाठी थाळीनाद आणि टाळ्या वाजवण्याचं आवाहन मोदींनी केलं होतं त्या डॉक्टरांपैकी किती डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू झाला याचीही माहिती मोदी सरकारकडे नाही. अशा स्वार्थी नेत्याचा आम्ही निषेध करतो, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise