मागासवर्गीयांच्या वरील हल्ले खपवून घेणार नाही : प्रविण धेंडे ; बलगवडे येथील पिडीत कुटुंबांची भेट घेवून दिला दिलासा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, September 27, 2020

मागासवर्गीयांच्या वरील हल्ले खपवून घेणार नाही : प्रविण धेंडे ; बलगवडे येथील पिडीत कुटुंबांची भेट घेवून दिला दिलासामागासवर्गीयांच्या वरील हल्ले खपवून घेणार नाही : प्रविण धेंडे ; बलगवडे येथील पिडीत कुटुंबांची भेट घेवून दिला दिलासा 

माणदेश एक्सप्रेस टीम


तासगाव : बलगवडे, ता. तासगाव, जि. सांगली येथे आमच्या शेतात कामाला का येत नाही? या कारणावरून घरात घुसून मातंग समाजाच्या तरूणाला मारहाण करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आज दिनांक २७/०९/२०२० रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) तालुकाध्यक्ष प्रविण धेंडे यांनी पीडित कुटुंब यांची बलगवडे येथे जाऊन प्रत्यक्ष भेट घेऊन त्याना धीर दिला व मागासवर्गीयांच्या वरील हल्ले खपवून घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.  


ज्या आरोपीना कठोर शासन व्हावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. असे प्रकार वारंवार घडत असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना भेटून कडक कार्यवाही व्हावी व असे प्रकार घडू नयेत म्हणून ॲट्रोसिटी कायद्याचे कडक अंमल बजावनी व्हावी म्हणून भेट घेणार असल्याचे ते म्हणाले.


पीडित कुटुंबाच्या बरोबर व सर्व समाजाच्या पाठीशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पुर्ण ताकतीनीशी उभा राहिल अशी ग्वाही व विश्वास त्यांनी सर्व समाज बांधवांना दिला. यावेळी सावळज ग्रामपंचायत सदस्य व मातंग समाजाचे नेते अमित कांबळे यांच्या सह बलगवडे गावातील सर्व समाज बांधव व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise