Type Here to Get Search Results !

प्राथमिक शिक्षकांना विमासंरक्षण नाकारल्याने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या सर्वेक्षणावर आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीचा बहिष्कार



प्राथमिक शिक्षकांना विमासंरक्षण नाकारल्याने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या सर्वेक्षणावर आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीचा बहिष्कार 

माणदेश एक्सप्रेस टीम


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने केवळ प्राथमिक शिक्षकांना शासनाने विमा संरक्षण नाकारल्याने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या सर्वेक्षणावर सर्वानुमते बहिष्कार टाकण्याचे निवेदन आटपाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज भोसले, गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मोरे यांना देण्यात आले.


यापूर्वी covid-19 अंतर्गत तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी चेक पोस्ट ड्युटी या प्रामाणिकपणे पार पाडल्या आहेत. शिवाय ऑनलाइन, ऑफलाइन,शैक्षणिक काम सुरू आहे. तसेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या सर्वेक्षणात केवळ प्राथमिक शिक्षकांना 50 लाखाचे विमा संरक्षण नाकारले आहे. त्यामुळे एखादी अघटित घटना घडली तर याला जबाबदार कोण? म्हणून जिल्हास्तराप्रमाणे तालुकास्तरावर समन्वय समितीच्या माध्यमातून बहिष्काराचे निवेदन देण्यात आले.  


यावेली सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन यु.टी.जाधव, शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष शामराव ऐवळे, शिक्षक संघ शि.द. पाटील गटाचे अध्यक्ष यशवंतराव गोडसे, शिक्षक संघ थोरात गटाचे अध्यक्ष असिफ मुजावर, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन चे अध्यक्ष रावसाहेब देवडकर, शिक्षक भारतीचे तालुकाध्यक्ष बिरुदेव मुढे, तालुका शिक्षक पतसंस्था चेअरमन शिवाजी लेंगरे, तंत्रस्नेही दत्तात्रय सुतार, सुनिल पवार आदी उपस्थित होते.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies